रक्तदान ही रोजची गरज: भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गुलवाडे
रक्तदान शिबीराचा नववा दिवस आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम; महानगर भाजपा महिला मोर्चाचा पुढाकार

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर : – कोरोनाच्या संकटामध्ये रक्तदाचा तुटवडा निर्माण झाला. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरात सिकलसेल व थेलसिमीया च्या रुग्णांना ताजा रक्ताची गरज असते. ती गरज पुर्ण करण्यासाठी रोज रक्तदान होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. ते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे आय.एम.ए. सभागृहात सोमवार, ७ जुनला आयोजित स्वेच्छा रक्तदान शिबीरात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलत होते. विशेष म्हणजे रक्तदान शिबीराच्या नवव्या दिवशी महानगर भाजपा महिला मोर्चाने पुढाकार घेतला.
यावेळी महानगर भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, शिबीर संयोजक प्रशांत विघ्नेश्वर, महिला मोर्चा महामंत्री व नगरसेविका शिलाताई चव्हाण, प्राचार्य प्रज्ञाताई गंधेवार, सपनाताई नामपल्लीवार, उपाध्यक्ष मंजुश्रीताई कासनगोट्टूवार, किरणताई बुटले, सचिव रेणुकाताई घोडेस्वार, मोनिषाताई महातव, ओबीसी महिला मोर्चाच्या वंदनाताई संतोषवार, रामकुमार आकापेल्लीवार, शुभम शेगमवार, मयुर चहारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या रक्तदान शिबीराच्या नवव्या दिवशी महिला मोर्चा महामंत्री सपनाताई नामपल्लीवार यांच्यासह शितलताई सोनडवले, सोनु बैस, निरुपाताई मुत्यालवार व वासुदेव बेले यांनी रक्तदान केले. या प्रसंगी प्रास्ताविकात मंजुश्रीताई कासनगोट्टूवार यांनी रक्तदानाचे महत्व विशद करीत एक युनित रक्तदानाने चार रुग्णांचा जीव वाचु शकतो असे सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन करीत नवव्या दिवसापर्यंत एकुण ४४ युनिट रक्तदान झाल्याची माहीती प्रशांत विघ्नेश्वर यांनी दिली. सपनाताई नामपल्लीवार यांनी आभार मांडले. रक्त संकलनासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील डॉ. किर्ती साने यांच्या चमुने महत्वाची भुमिका बजावली.