चंद्रपुर जिल्हातील राजुरा वनपरिक्षेत्रात आढळला वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह.

50

✒️संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी✒️
राजुरा/चंद्रपूर,दि.9 जुन:- चंद्रपुर जिल्हातील मध्य चांदा वन विभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या विहीरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक १७२ 172 मध्ये नर वाघाच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडली आहे. या वाघाचा मृत्यू कशाने झाला, कधी झाला हे पोस्टमादम अहवाल आल्यानंतरच समोर येणार. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पंचनामा व पुढील चौकशी सुरू केली आहे. अशी माहिती चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी दिली.

वन विभागाकडुन प्राप्त माहितीनुसार या वाघाचा गोपनीय पद्धतीने राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पंचनामा करून वाघावर अंत्यसंस्कार करण्यातआले आहे. 4 ते 5 दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. वाघाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. परंतु, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमाडम अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी दिली.