एटापल्ली आज दि.८ जून रोजी धर्मरावबाबा आत्राम आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्या उपस्थितीत

45

एटापल्ली आज दि.८ जून रोजी धर्मरावबाबा आत्राम आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद

एटापल्ली आज दि.८ जून रोजी धर्मरावबाबा आत्राम आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्या उपस्थितीत
एटापल्ली आज दि.८ जून रोजी धर्मरावबाबा आत्राम आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्या उपस्थितीत

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मिडिया वार्ता न्यू

तालुक्यात सुरजागड लोह खनिज प्रकल्प व इतर गावाचा
विकासाचा मुद्द्यावर चर्चा

एटापल्ली:-गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा एटापल्ली तालुका व महाराष्ट्रात नावलौकिक असलेला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प,या प्रकल्पाचे काम त्रिवेणी कंपनी ने हातात घेतला असून इथे कामाची सुरुवात देखील झाली आहे.
आमदार आत्राम यांनी सांगितले की,त्रिवेणी कंपनीचा मार्फत हा लोह खनिज चा काम होणार असून याचा फायदा तालुक्यातील नागरिकांना देखील होईल.तालुक्यात अनेक सुशिक्षित बेरोजगार आहे या प्रकल्प मुळे बेरोजगाराचा हाताला रोजगार मिळेल व तालुक्याचा देखील विकास होईल.कॉविड १९ महामारीचा काळात ऑक्सिजनचा कमतरतेमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले त्याची दखल घेत त्रिवेणी कंपनी ने एटापल्ली येते ऑक्सिजन प्लॅट उभारणी करण्याचा निर्णय घेतलाअसुन याचा फायदा संपूर्ण तालुक्यावसीयांना होईल व याच सोबत तालुक्यातील नागरिकांचा विचार करत निःशुल्क उपचार करण्यात येईल रुग्णालयची ही उभारणी करण्याचा काम कंपनी करती आहे याचा लाभ फक्त कंपनीच्या कामगारांना नसून सर्व नागरिकांना निःशुल्क राहील असे सुद्धा सांगण्यात आले.मागील काही वर्षांपासून आलापल्ली ते चोखेवाळा रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून अध्यपी काम सुरू झाले नाही.रस्त्याची गंभीर परिस्थिती असल्याने जड वाहने व लोह खनिज वाहने वाहतूक करण्यास खूप अडचणनीना सामना करावा लागत होता.आलापल्ली ते चोखेवाळा या रोडाचे कामा करिता १५१ कोटी रुपये मंजूर झाले असून त्रिवेणी कंपनी ने हा काम हाती घेतला असून लावकरत लवकर रोडच्या कामाची सुध्दा सुरवात होईल पहिल्या टप्प्यात आललापल्ली ते एटापल्ली दुसऱ्या टप्प्यात एटापल्ली ते कसमसुर या पद्धतीने काम करण्यात येईल व कंपनी अतिरिक्त यात पैसे खर्च करून रोड चा काम चांगल्या पद्धतीने करेल असे ही त्रिवेणी कंपनीचे व्हाईस चेअरमॅन मेहता यावेळी उपस्थित होते तालुक्यात काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा झाला नसून मागील काही महिन्यांपूर्वी वेनहारा इलाक्यातील ७२ गावचे महाग्रामसभा प्रतीनिधी व गावकऱ्यांनी जिल्हा मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शाखा गडचिरोली यांना कसनसुर येथे ३३ के.वि वीज उप केंद्रा करिता निवेदन देण्यात आले होते,या कामाला २००५-०६ साली मंजुरी मिळाली असून अध्यपी काम सुरू झाले नाही आता याची सुद्धा दखल घेत आमदार आत्राम यांनी हा काम सुद्धा त्रिवेणी कंपनीच्या हातात दिला असून काम लावकरत लवकर सुरू करण्यात येईल असे सुद्धा सांगितले आहे.