खारघरमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टने केला कोरोडोची फसवणूक, चार भष्ट्राचारीवर गुन्हे दाखल.

53

खारघरमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टने केला कोरोडोची फसवणूक, चार भष्ट्राचारीवर गुन्हे दाखल.

खारघरमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टने केला कोरोडोची फसवणूक, चार भष्ट्राचारीवर गुन्हे दाखल.
खारघरमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टने केला कोरोडोची फसवणूक, चार भष्ट्राचारीवर गुन्हे दाखल.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई,दि.9 जुन:- मुंबईच्या उपनगर खारघरमधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खारघर येथील आरटीआय पब्लीक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोडो रुपयांने अनुदान देण्याचे अमिष दाखवून 15 लोकांना 1 करोड 98 लाख रूपयांना फसवणुक केल्याचे समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास आर्थीक गुन्हे शखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील श्री शंकर स्वामी बहुउद्देशीय विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष व श्री साई सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी याविषयी तक्रार केली आहे. जाधव हे पदाधिकारी असलेल्या संस्थेच्यामाध्यमातून शैक्षणीक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या शाळेतील एक शिक्षकाने खारघरमधील आरटीआय पब्लीक चॅरीटेबल ट्रस्टकडे हजारो कोटी रूपये आहेत. ते सामाजीक उपक्रमासाठी संस्थेला पाच कोटीपर्यंत मदत उपलब्ध करून देतील असे सांगितले. जाधव यांनी मे 2019 मध्ये खारघरमधील आरटीआय ट्रस्टच्या कार्यालयात येऊन माहिती घेतली. आरटीआय ट्रस्टचे संस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाधव यांना आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली.

ट्रस्टचे आयसीआयसीआय बँकेत 7889 करोड रूपये शिल्लक असल्याचे सांगितले. राज्यातील अनेक संस्थांना मदत केल्याचेही सांगितले. ज्या संस्थांना मदत हवी आहे त्यांनी 5 लाख रूपये भरून ट्रस्टचे सदस्य व्हावे असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी त्यांच्या दोन्ही संस्थांच्या नावाने एकूण 10 लाख रुपये दिले. आरटीआय ट्रस्टने त्यांच्या दोन्ही संस्थांसाठी 5 करोड रूपयांचा चेक दिला. परंतु चेक बँकेत जमा करू नका असे सांगितले. चेकवरील तारखेची मुदत संपल्यानंतर पुन्हा ट्रस्टशी संपर्क साधला असता ट्रस्टचे फिनो बँकेशी टायप झाले असून तेथे 400 कोटी रूपयांची फिक्स डीपॉजीट करत आहोत. त्यानंतर पैसे देतो असे सांगितले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळाले नसल्यामुळे जाधव यांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरटीआय चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी मिळून 4 जणांविरोधात 4 जूनला गुन्हा दाखल केला आहे.

आरटीआय ट्रस्टने जाधव यांच्याप्रमाणे जवळपास 15 पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे. या सर्वांची एकूण 1 करोड 98 लाख रूपयांची फसवणूक झाली असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. हे प्रकरण तपासासाठी नवी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

भगवान गायकवाड – 05 लाख, कुंदन शिंदे – 05 लाख, निलेश घुगे – 05 लाख, जगन्नाथ जाधव – 10 लाख, आदित्य पगारे – 10 लाख, गणेश ढोबळे – 25 लाख, किरण गायकवाड – 40 लाख, मनोज सोनवणे – 03 लाख, राजु बोढरे – 03 लाख, वैशाली नेहरकर – 25 लाख, दादासाहेब मुंडे – 03 लाख, शशी देवरे – 17 लाख, सुदर्शना अशोककुमार – 07 लाख, मंगेश भागवत – 35 लाख, गणेश जगताप – 05 लाख या नागरिकांची मोठ्या प्रमाणात झाली फसवणूक झाली आहे. पोलीस तपासात पुढे अनेक लोक समोर येऊ शकते. यांची माहिती पोलीस विभागाला देण्यात यावी.