वर्धा जिल्हात ट्रेलर पलटला 37 जनावरांचा जागीच मृत्यू, 11 बैल गंभीर जखमी.

✒️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒️
वर्धा,दि.9 जुन:- वर्धा जिल्हातील कारंजा घाटगे येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 48 जनावर घेऊन एक ट्रेलर नागपूरवरून अमरावतीकडे जातांना सावळी खुर्द घाटाजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास ट्रेलर क्रमांक एचआर -55- एस 8795 पलटून 37 जनावरांचा मृत्यू झाला तर 11 बैल गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती कारंजा पोलीस स्टेशनला सकाळी आठ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानंतर कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार दारासिंग राजपूत आपल्या चमूसह घटनास्थळावर दाखल झाले.
अपघातातील जखमी झालेल्या जनावरांना व मृत पावलेला जनावरांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने काम केले. अपघात होताच चालक, वाहक घटनास्थळावरून पसार झाले होते. सदर घटनेत मृत झालेल्या 37 जनावरांवर वेगळ्या ठिकाणी रस्त्यालगतच अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जखमी 11 बैलावर पशुसंवर्धन विभागाच्या चमूनी उपचार केले आहेत. जखमी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्यांची व्यवस्था पोलिस विभागाने केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहनडुळे, पोलिस उपनिरीक्षक मानकर यांच्यासह चमू उपस्थित होती.