माणगांव रेल्वे स्टेशनंजवळ रेल्वेची ठोकर लागून एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू…

58

माणगांव रेल्वे स्टेशनंजवळ रेल्वेची ठोकर लागून एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू…

✍️सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301

माणगांव :-माणगाव तालुक्यातील माणगांव गोरेगाव हद्दीत काल दि.८ जून रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची खबर रेल्वे सुरक्षा बल कोलाड चे कॉस्टेबल राहुल सूर्यवंशी वय वर्ष ३३ रा. मनीषा अपार्टमेंट वरसगाव पो. कोलाड ता. रोहा यांनी माणगांव पोलीस ठाण्यात दिली.

https://mediavartanews.com/2023/06/08/maharashtra-premier-leauge-teams-and-players/

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की माणगांव रेल्वे स्टेशनं ते गोरेगाव रेल्वे स्टेशनं दरम्यान स्टोन क्रमांक ३१/००० ते ३१/०१ च्या मध्ये रुळावर हा अपघात घडला आहे या मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे ३० ते ४० दरम्यान आहे. या घटनेचा गुन्हा माणगांव पोलीस ठाण्यात २४/२०२३ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे झाला असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर भोजकर,पोलीस सब इन्स्पेक्टर गायकवाड,सह,पो. फौंजदार निमकर हे करीत आहेत.

https://mediavartanews.com/2023/06/08/kolhapur-riots-latest-news-updates/