आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ७३ बाटल्या रक्त संकलन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७३ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी ७३ वृक्ष रोप वाटप करण्यात आले.
आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित आदर्श परिवारातर्फे दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. यंदा त्यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त देखील संस्थेच्या मुख्य कार्यालयात, आदर्श भवन येथे रविवारी ( दि. ८)
रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आदर्शतर्फे वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते व संकलन झालेल्या रक्ताचे जे कार्ड्स असतात ते आदर्श संस्थेत ठेवली जातात व ज्या गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते त्यांना ती कार्ड्स मोफत देऊन त्याबद्दल्यात शासकीय रक्तपेढीतून मोफत रक्त पुरवले जाते.
नुकताच जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला . त्याचे औचित्य साधून सुरेश पाटील यांच्या ७३ व्या वाढदिवशी ७३ जणांना फळ झाडाचे रोपांचे वाटप करण्यात आले. फळ झाडाचे रोप असल्यामुळे लोक ते आपल्या अंगणात, शेतावर किंवा परिसरात लावून त्याची निगा राखून ते वाढवतील , हा त्यामागचा हेतू आहे असे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.
रक्तदान शिबिराचे उदघाट्न झाल्यावर संस्थापक सुरेश पाटील , संचालक विलाप सरतांडेल, संचालक्त भगवान वेटकोळी यांचा वाढदिवस कर्मचारीवर्गाने साजरा केला. आदर्श पत संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, संचालक मंडळातील सदस्य अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, ऍड. आत्माराम काटकर, विलाप सरतांडेल, भगवान वेटकोळी, महेश चव्हाण, रामभाऊ गोरीवले, ऍड. रेश्मा पाटील, ऍड. वर्षा शेठ, सनदी लेखापाल संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते.