हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने 300 विद्यार्थ्यांचा गुणगौरव…
प्रतिनिधी: ज्ञानेश्वर तुपसुंदर नाशिक
मो. 8668413946
नाशिक: हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा राजीव नगर येथील वेदांत मंगल कार्यालय ह्या ठिकाणी संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्राध्यापक नितेश मोरे यांनी विद्यार्थी आणि पालकांना उत्तम करिअर बाबत मार्गदर्शन केले. तब्बल ३०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मागील चार वर्षापासून दरवर्षी या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन पूजा देशमुख व सागर देशमुख यांच्या वतीने करण्यात येते.
यावर्षीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे ह्या हेतूने हिंदू जनसंपर्क कार्यालय व अपेक्स लर्निंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला. माधुरी बापट, रमाकांत जगताप, अमोल देशमुख, योगेश हडपे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे, इंदिरानगर अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष दत्ता दंडगव्हाळ व युवा कार्यकर्ते आकाश कदम आदी मान्यवरांच्या हस्ते हा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.
तसेच कार्यक्रमाच्या समारोपानंतर पूजा देशमुख व सागर देशमुख यांच्यातर्फे विद्यार्थी व पालकांसाठी मिसळ पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते.