Home latest News नागपूरच्या संविधान चौकात प्रा. डॉ. गजेंद्र गवई “प्रेरणा परिवर्तन जीवन गौरव पुरस्कार...

नागपूरच्या संविधान चौकात प्रा. डॉ. गजेंद्र गवई “प्रेरणा परिवर्तन जीवन गौरव पुरस्कार – २०२६” ने सन्मानित

113

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,धम्म कार्याची विशेष दखल, अमेरिका विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

(पत्रकार /प्रतिनिधी ) मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी चे भूमिपुत्र प्रा. डॉ. गजेंद्र गवई यांच्या गेल्या ३५ वर्षाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धम्म प्रचार व प्रसार कार्याची विशेष दखल घेऊन नागपूरच्या ३६५ दिवस पुष्पहार अर्पण संकल्प अभियान समिती च्या वतीने दिनांक ७ जून २०२६ रोजी संविधान चौक, नागपूर येथे आयोजित समितीच्या ४ थ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या संविधान चौकात “प्रेरणा परिवर्तन जीवन गौरव पूरस्कार-२०२६ ” ने विशेष सत्कार करून उपस्थित मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . दिनांक २८ मे २०२२ ते २८ मे २०२६ या कालावधीत नागपूर च्या सुप्रसिद्ध अशा संविधान चौकात असलेल्या विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास समिती च्या वतीने दररोज पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला.

या अभियानाचा उद्देश फक्त १४ एप्रिल, १४ ऑक्टोबर, ६ डिसेंबर किंवा संविधान दिनी च फक्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे महत्वाचे नसून वर्षाचे ३६५ दिवस हि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे व संघर्षपूर्ण जीवनाचे स्मरण करून समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांचे विचारांचे संदेश पोहचविणे.हा उद्देश समिती चे संस्थापक बोधगया चे भन्ते हर्षबोधी महास्थविर यांनी करून ३६५ दिवस पुष्पहार अर्पण संकल्प अभियान समिती ची स्थापना केली. या प्रेरणादायी संकल्पास चार वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कार्यरत व्यक्तींचा विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता.

ज्यामध्ये देऊळगाव माळी चे भूमिपुत्र जेष्ठ समाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा युवा प्रबोधनकार प्रा. डॉ. गजेंद्र गवई यांना नुकताच अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ टॉलोसा -मॅक्सीको च्या वतीने सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क या मानद पदवी सह डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड -२०२६ ने सन्मानित केल्याबद्दल सदर वर्धापन दिनी संकल्प अभियान समितीच्या वतीने “प्रेरणा परिवर्तन जीवन गौरव पुरस्कार- २०२६ ” ने सन्मानित करून विशेष नागरी सत्कार करण्यात आला .

संविधान चौक नागपूर येथे आयोजित सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी समितीचे संस्थापक भन्ते हर्षबोधी महास्थविर , उदघाटक डॉ. नवीनचन्द्र रेड्डी (IPS )संयुक्त पोलीस आयुक्त नागपूर, स्वागता माजी आमदार प्रकाश गजभिये, मुख्य अतिथी समाजभूषण डॉ. भिमराव हत्तीआंबीरे, (संबोधी अकॅडमी परभणी ) लॉर्ड बुद्धा टीव्ही संचालक भय्याजी खैरकर,माजी आमदार मिलिंद माने, पोलीस अप्पर आयुक्त राजेंद्र दाभाडे (IPS),फिनिक्स अकॅडमी चे निलेश कराळे (वर्धा ), डॉ,शंकरराव खोब्रागडे, जेष्ठ समाजसेवि नामदेव अग्रवाल,राधाकृष्ण हॉस्पिटल चे गोविंद पोतदार, लहू सेना महाराष्ट्र अध्यक्ष संजय कंठाळे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवर यांनी महामानवाच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. पुरस्कार वितरण व सम्मान सोहळ्यात प्रा. डॉ. गजेंद्र गवई यांना उपस्थित मान्यवर,मुख्य अतिथी यांचे शुभ हस्ते *प्रेरणा परिवर्तन जीवन गौरव पुरस्कार -२०२६ म्हणून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,पंचशील शाल, पुष्पहार बुके व भारतीय संविधान सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. कार्यकमाचे सूत्रसंचालन अध्यक्षा ऍड. स्मिता ताकसांडे यांनी केले तर आभार सचिव ज्योती बेले यांनी मानले.

सदर नागरी सन्मान जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. गजेंद्र गवई यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संघटना, लोकशिक्षण संस्था, मातृभूमी संस्था, सम्यकक्रांती सोशल फोरम महाराष्ट्र राज्य, भीमज्योती सार्वजनिक वाचनालय, उपासक उपासिका महाफेडरेशन पदाधिकारी समाज बांधव, हितचिंतक, मित्रपरिवार यांचेकडून अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र भरातून फोन कॉल व सोशल मीडिया माध्यमा द्वारे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिक महिला पुरुष तरुणाई उपस्थित होते.