ईडी आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे: मंत्री बच्चू कडु

ईडी आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे: मंत्री बच्चू कडु

ईडी आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे: मंत्री बच्चू कडु
ईडी आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे: मंत्री बच्चू कडु

मुकेश चौधरी✒
विदर्भ ब्युरो चीफ
7507130263
अमरावती/मुंबई,दि.9 जुलै:- सध्या राज्यात ईडीचे राजकारण फार मोठ्या प्रमाणात तापले आहे. राजकारणी ईडीच्या नावाने नेत्यांना धमकवत असल्याचे समोर येत आहे. म्हणून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या मानगुटीवर ईडीचे भूत झोंबले की असे प्रश्न सामान्य नागरीकाना पडत आहे.

ईडीच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. पूर्वी लोकांच्या मतांनी सत्तांतर व्हायचं, आता भाजप ईडी ने सत्तांतर करत आहेत. भाजपचे सर्व नेते हरीशचंद्राची औलाद आहे का? भाजपचा एकंही नेता भ्रष्टाचारी नाही का? एकाही भाजप नेत्यावर ईडी ची कारवाई का नाही?, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. इंग्रजानंतर सत्तेचा इतका दुरुपयोग भाजप करतेय, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई अयोग्य, ईडी च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे यावेळी बच्चू कडू म्हणाले.