*”शिवराया विद्यार्थी संघटना,” म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या युवाशक्तिचा महासागर*

प्रा.अक्षय पेटकर
उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा
9604047240
अलीपुर : -मंडळी हल्लीची तरुणाई म्हणजे तासनतास मोबाईल मध्ये डोक खुपसुन चटींग, युट्युब वर वायफळ चित्रफीती बघने, एखाद्या पानटपरीवर कट्यावर बसुन खर्रा चघळत पचकन रस्त्यावर थुंकने व येणाऱ्यां जानाऱ्या मुलींची टिंगल टवाळी करणारे टारगट . असच काहीसं चित्र यत्र तत्र सर्वत्र बघायला मिळते. पण अल्लीपुर येथिल शिवराया विद्यार्थी संघटना ची युवाशक्ति याला पुर्णत: अपवाद ठरत आहेत. मी अल्लीपुरला मंडळ अधिकारी म्हणून रुजु झाल्यानंतर या युवाशक्तिच्या सामाजिक बांधिलकी चा मला पावलो पावली अनुभव येत आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन ठिकठिकाणी वृक्षारोपन करणे, कृषि दिना निमित्य शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचा शाल श्रिफळ देऊन सत्कार करणे. डाक्टर डे निमित्य कोरोणा जागतिक महामारीत फ्रंटलाईन योध्याची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांचा शाल श्रिफळ देऊन सत्कार करणे. स्वच्छता अभियान, प्रबोधनात्मक सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करणे. असे नानाविध कौतुकास्पद उपक्रम बघुन उर अभिमानाने भरुन येतो*.
युवाशक्ति म्हणजे घोंगावणारं प्रचंड वादळ, युवाशक्ति म्हणजे उंच कड्यावरुन वेगाने खाली कोसळणारा जलप्रपात, युवाशक्ति म्हणजे मदमस्त होऊन उधळलेला खोंड. पण प्रचंड वाहणार्या जलप्रपातातुन जनकल्याणकारी विजनिर्मिती व्हावी.घोंगावणार्या सुसाट वाऱ्या पासून पवन उर्जा मिळावी यासारखं दूरदृष्टी असुच शकत नाही. रानावनात भटकणाऱ्या मावळ्यांना संघटीत करुन महाराजांनी यवनी राजवटीला ऊलथवुन हिंदवी स्वराज्याची स्थापणा केली. श्री. रामचंद्र प्रभुंनी वानरसेने ला संघटीत करुन बलाढ्य रावणाला समुद्र ओलांडुन नामोहरण केले. लंकेचे सत्तांतरण केले. “शिवराया विद्यार्थी संघटना” सुध्दा अशाच युवाशक्तीचा कलाविष्काराचे मूर्तिमंत उदाहरण आहे*..
*अल्लीपुर येथील विद्यार्थी मित्र नितिन सेलकर यांनी मार्गदर्शक कैलाश घोडे , डा. वाघमारे यांच्या सोबत गांवातील विकास गोठे, श्रृंणय ढगे,निशांत लांभाडे, रोशन नरड,मयुर डफ, दिनेश गुळघाने आकाश घुसे आणि ईतर अशा शेकडो युवकांना संघटीत करुन शिवराया विद्यार्थी संघटनेची मुहुर्तमेढ रोवली*.
*शिवराया विद्यार्थी संघटनेचे सर्वच शिलेदार हे समाज सेवेच्या आणि पर्यायाने राष्ट्रसेवेच्या पावन कार्यपुर्ती करीता ध्येयवेडे सेवेकरी आहेत. त्यांच्या या सेवेसाठी कुणी पारीश्रमिक मुळीच ठरविलेले नाही. त्यांना दिलीच तर कौतुकाची थाप मिळते आणि समाजसेवेचे अलौकीक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते.बरं हे सेवेकरी घरचे गर्भश्रिमंत सुध्दा नाहीत. त्या सर्वांना आपल्या कुटुंबाचा चरीतार्थ चालवण्या साठी मेहनत मजुरी करावीच लागते. हे सर्व करुण ते समाजाप्रती असलेलं त्यांच उत्तरदायीत्व प्रामाणिकपणे स्वयंस्फुर्तीने पार पाडतात. आणि म्हणुनच त्यांची सेवा हि निष्काम सेवा आहे. श्रीमदभगवदगिते च्या दुसऱ्या अध्यायात निष्काम सेवे बाबत भगवान श्रिकृष्ण सांगतात*.
*कर्मण्येवाधिकारस्ते| मा फलेषु कदाचण* |
*मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सग्ड़ो$स्त्वकर्मणि ||४७||
अर्थात जि सेवा करतांना मानव कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवत नाही त्या कर्माला निष्काम कर्म म्हणतात. आणि असे निष्काम कर्म करणाऱ्या ला निष्काम कर्मयोगी म्हणतात. शिवराया विद्यार्थी संघटनेतील सर्व सेवेकरी हे खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी आहेत यात तिळमात्र शंका नसावी.
शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितिन सेलकर, निष्काम सेवेकरी तथा मार्गदर्शक कैलाश घोडे , डा. वाघमारे, आणि संघटनेतील सर्व शिलेदार यांच्या सेवाभावी वृत्तीला माझा मानाचा मुजरा. आणि भविष्यसूचक उज्वल मनःपुर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे, शिवराया विद्यार्थी संघटना सकल युवावर्गा साठी प्रेरणादायी ठरेल.