रानडुक्कराच्या हल्लात दोघे जखमी
सकमुर येथील घटना
शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.न.9518727596
सकमुर गावालगत असलेल्या शेतशिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या बाप लेकावर रानडुक्कराने हल्ला केला
यात दोघेही जखमी झाले. कित्येक दिवसापासून रानडुक्कराने चांगलाच कहर माजवला आहे.गावातील नागरिकांना एकदिवसा पाठोपाठ रानडुक्कराच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे.आज शेळ्यांच्या कळपाला गावा लगतच्या शिवारात चारायला नेले असता श्री. कुशाबराव मुंजनकर व त्यांचा लहान मुलगा कु.सुमित कुशाबराव मुंजनकर या दोघा-बापलेकाला जखमी केल्याची घटना दि.09-07-2022 शनिवारी दुपारी 3:45 च्या सुमारास घडली. रानडुक्कराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असल्याने जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले आहे.