मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी : पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी
: पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी : पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगाव

मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांनी शनिवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी गावातून वृक्षदिंडी काढून पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला . आणि विद्यालयात वृक्षारोपण केले.
वारकरी पोषाखातील टाळकरी विद्यार्थी , विठ्ठल रुक्मिणी देवीची प्रतिमा , विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेले विद्यार्थी आणि कलश तुळस तसेच इतर वृक्ष घेऊन वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीतील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले . दरम्यान वृक्ष वाचवा वृक्ष जगवा असे नारे देण्यात आले. वृक्ष दिंडी संस्कार विद्या मंदिरातून गांधी चौकामध्ये नेण्यात आली वृक्षदिंडी गावातून जात असताना अनेक ठिकाणी ग्रामस्थ दिंडीचे स्वागत करीत होते , यांनी पर्यावरणाबदल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.त्यावेळी स्वस्कार विद्या मंदिर मधील शिक्षक शिक्षिका आणि वारकरी वेशातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनि उपस्थित होत्या..याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले .अक्षय गुट्टे , सौ. रुपाली पोधाडे, सौ.ज्योती टिकाईत, सौ. नेहा कोल्हाल, सौ.श्रद्धा घुगे, सौ.स्वाती सुरडकर, सौ.अयोध्या चतरकर, सौ. सीता शिंदे, सौ.निकिता गुट्टे, पायल दायमा, अंजुम मॅडम, पुजा साठे मॅडम, फाजल भाऊ, प्रणय चोथमल, मिरा कांबळे,यांनी परिश्रम घेतले. ✍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here