अजित आगरकर निवड समितीचे नवे अध्यक्ष

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. अजित आगरकर यांची या पदासाठी निवड होणे अपेक्षितच होते कारण मागील काही वर्षात निवड समिती अध्यक्षपद हे वादाचे पद ठरले होते. विशेषतः चेतन शर्मा हे निवड समिती अध्यक्ष असताना त्यांनी बीसीसीआयवरच टीका केली त्याचे स्टिंग ऑपरेशन एका न्यूज चॅनलने केले होते त्यानंतर त्यांची हकालपट्टी होणार हे निश्चित होते. त्यांची हकालपट्टी झाल्यावर शिवसुंदर दास हे काळ निवड समिती अध्यक्ष बनले त्यामुळे नवीन अध्यक्ष निवड समितीला मिळणार हे पक्के होते.

निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी सुरवातीला वीरेंद्र सेहवागचे नाव चर्चेत होते मात्र त्यांनी अधिक मानधन मागितल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर या पदासाठी केवळ एकमेव अर्ज आला तो म्हणजे आगरकर यांचा. त्यामुळे त्यांची निवड होणार हे निश्चित झाले. निवड समितीच्या अध्यक्षपदी आगरकर यांची झालेली निवड स्वागतार्ह आहे. या पदासाठी ते सर्वार्थाने लायक आहेत. २६ कसोटी आणि १९० एकदिवसीय सामने खेळलेले आगरकर यांना स्थानिक क्रिकेटचा देखील दांडगा अनुभव आहे. शिवाय मुंबई क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदाचा देखील त्यांना अनुभव आहे. मुंबई निवड समिती अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. निवड समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी काही कठोर निर्णयही घेतले होते. सुर्यकुमार यादवचा सूर हरपल्यानंतर त्यांनी त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. आता देशाच्या निवड समितीचे अध्यक्ष बनल्यावर देखील ते असाच कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे पाहणार नाही.

The provided API key has an IP address restriction. The originating IP address of the call (2a01:4f9:4b:105b::2) violates this restriction.

सध्या भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी कठोर स्पर्धा आहे. अनेक खेळाडू संघाची दारे ठोठावत आहेत. शिवाय जुने अनुभवी खेळाडूही संघात आहे त्यामुळे संघ बांधणी करताना त्यांना युवा आणि अनुभवी खेळाडूंचा मिलाफ घालावा लागणार आहे. त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवड करणे. ही स्पर्धा भारतात असल्याने भारतीय संघाकडून संपूर्ण देशाला अपेक्षा आहे.

विश्वविजियी संघ निवडणे हा मोठे आव्हान आहे मात्र अजित आगरकर त्यात यशस्वी होतील आणि देशाला पुन्हा एकदा विश्वविजेता करतील यात शंका नाही. नवनियुक्त निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचे मनापासून अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here