महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.हर्षवर्धन सपकाळ यांची ‘सहयोग’ पतसंस्थेला सदिच्छा भेट
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मान्यवरांचे भेटीचे सत्र सुरुच
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच अलिबाग येथील सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध मान्यवरांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात येत असून, सपकाळ साहेबांची भेट हे या सत्रातील एक महत्त्वाचे पर्व ठरले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष योगेश रामदास मगर यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सपकाळ साहेबांचे औपचारिक स्वागत केले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष संजय ह.पाटील, संचालक सुनिल तांबडकर, निळकंठ केमकर, मोहन वैद्य, प्रविण कामत, जागृती शिगवण, श्रावणी मगर, सल्लागार जहिंद्र पाटील,कायदेविषयक सल्लागार प्रथमेश पाटील, सभासद प्रकाश देशमुख, व्यवस्थापक वैभव बोर्लीकर तसेच संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
सपकाळ साहेबांनी संस्थेच्या आर्थिक कामकाजाचा आढावा घेतला. पारदर्शकता, सेवाभाव, सहकार मूल्यांप्रती असलेली निष्ठा आणि सामाजिक भान जपत संस्थेने केलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन दिले.
या भेटीत संस्थेच्या विविध योजनांवर चर्चा झाली. सपकाळ साहेबांनी या उपक्रमांची माहिती घेत समाधान व्यक्त केले. याआधीही विविध मान्यवरांनी संस्थेला भेट देऊन मार्गदर्शन केले असून, सपकाळ साहेबांची भेट संस्थेसाठी विशेष प्रेरणादायी ठरणारी आहे.
सहयोग पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात मिळणारे असे मार्गदर्शन व सहकार्य संस्थेच्या सामाजिक बांधिलकीला नवी दिशा देणारे आहे.