आगरी सामाजिक संस्थेचा 9
वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- आगरी सामाजिक संस्था अलिबागचा ९वा वर्धापन चरी गावातील हनुमान मंदिर येथे
साजरा करण्यात आला. आगरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा वर्धापन दीन साजरा करण्यात आला…
आगरी सामाजिक वर्धापन दिना निमित्ताने समाजातील अनेक गुणवंत कलाकार समाजापुढे आले.. कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. मानसी म्हात्रे, चरी गावच्या माजी सरपंच नीलम प्रशांत पाटील, प्रमोद भगत,नामदेव पाटील,अनिल पाटील, कविवर्य राजाराम भगत. नरेश पाटील,जो.जो पाटील गुरुजी, काशिनाथ नागावकर,नंदेश म्हात्रे, दिलीप मोकल,असे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
मुख्य अतिथीअँड. मानसी म्हात्रे यांनी आपलं मनोगत सांगितले की आगरी लोकांसाठी एक स्वतंत्र आगरी भवन उभारून देण्याचा चिऊ ताईंच्या माध्यमातून आश्वासीत केलं . काही कमी पडलं तर तशीच जर वेळ आली तर मी स्वतः आगरी भवाना साठी माझी प्रॉपर्टी विकून आगरी भवन उभारून देऊन असे आश्वासन दिले.
या वेळी ढवळे गीतांचे विवचन व गायन चारुशीला म्हात्रे कामोठे यांनी आपल्या मनमोहक शैलीने सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली .काशी पाटील सरांनी पलटी कविता सादर करून जुन्या आठवणींना उजाला दिला, कवी लेखक राजाराम भगत, दिलीप मोकल हाशीवरे, गणेश पाटील यांनीकविता सादर केली.
तेवीस वर्षे अखंडपणे शहापूर ते आळंदी पायी दिंडी वारी करणारे प्रकाश विश्वनाथ भगत यांनी वारकरी गीत सादर केले, प्रवचनकर सुवर्णताई भगत यांनी विठ्ठलाची दोन अभंग गायली. धेरंड गावचे ह.भ. प जो. जो. पाटील गुरुजीं ज्यांनी आपले आयुष्य अखंड हरिनामात घालवलं त्यांनी आगरी भवन उभारण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदेश पिंगळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चरी गावातील ग्रामस्थ व राजश्री पाटील आणि परिवार व महिला यांनी विशेष परिश्रम घेतले.