सिंदेवाहीचे नवीन ठाणेदार कांचन पांडे यांनी साधला पत्रकारांशी संवाद
नवीन ठाणेदारापुढे गुन्हेगारी निर्मूलन, आणि सामाजिक एकोपा राखण्याचे आव्हान
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी –
मो न 8806689909
सिंदेवाही :- नुकतेच सिंदेवाही पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झालेले कांचन पांडे यांना तालुक्यातील गुन्हेगारी निर्मूलन सह, सामाजिक एकोपा राखण्याचे आव्हान असून, शहरातील गुन्हेगारी, नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची पत्रकारांशी संवाद साधतांना ग्वाही दिली.
सिंदेवाही तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी सोमवारी ठाणेदार कांचन पांडे यांना सदिच्छा भेट दिली असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाणेदार कांचन पांडे हे मुळचे नागपूर येथील रहिवाशी असून ते महाराष्ट्रातील अनेक पोलिस स्टेशन मध्ये कामाचा अनुभव घेत त्यांनी जिवती सारख्या अतिदुर्गम भागात ठाणेदार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. नुकतेच ते सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. शहरातील किंवा ग्रामीण भागातील गुन्हेगारी असो, याचा विमोड करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला आहे. दरम्यान शहरातील एकोपा वाढवून सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार असून अवैध्य व्यवसाय, अवैध्य दारू विक्रेत्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाही करणार , रहदारीच्या समस्येसह चिडीमारीवर अंकुश लावण्याचा मानस ठाणेदार कांचन पांडे यांनी बोलून दाखविला आहे. शाळकरी मुलामुलींच्या व्यसनावर अंकुश लावण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालय येथे भेट देऊन मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कामतवार, उपाध्यक्ष मिथुन मेश्राम, सचिव महेंद्र कोवले, सहसचिव अमोल बनसोड, कोषाध्यक्ष संदीप बांगडे, अमन कुरेशी, अमोल निनावे, कुणाल उंदीरवाडे, जितेंद्र नागदेवते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. ठाणेदार कांचन पांडे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी तालुका पत्रकार संघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.