धारावीतील दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

धारावी –  मुंबई महानगरपालिका नियोजन विभागांतर्गत महिला बालकल्याण योजनेद्वारे मिलकर अँप मार्फत आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ संगीता हसनाळे(सहा.आयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली जी/ग विभागातर्फे आर्ट ऑफ लिविंग यांच्या सौजन्याने धारावीतील दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तू (२५ के जी) देण्यात आले. यावेळी मनपाचे समाजकल्याण विभाग अधिकारी सुरेश पालवे,प्रभाग समिती अध्यक्ष वसंत नकाशे,उपविभागप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी,युवासेना विभागाधिकारी प्रवीण जैन,पत्रकार भिमराव धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालवे यांनी सदर योजना मागील तीन महिन्यापेक्षा जास्त वेळा मुंबईतील २४ वॉर्डात राबवण्यात येत आहे. यासाठी ज्या संस्थांनी व संबंधित वॉर्डातील नगरसेवकांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले.
वसंत नकाशे यांनी महानगरपालिकेचे कौतुक करून कोविड-१९ मध्ये महापालिका कर्मचारी,नियोजन विभाग,सहा.आयुक्त किरण दिघावकर,पालवे यांचे धारावीतील दिव्यांग बांधवांना मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.