कार्तिक नगर (उडिया फैल) येथील अनेक युवकांचा भाजपात प्रवेश

कार्तिक नगर (उडिया फैल) येथील अनेक युवकांचा भाजपात प्रवेश

कार्तिक नगर (उडिया फैल) येथील अनेक युवकांचा भाजपात प्रवेश
कार्तिक नगर (उडिया फैल) येथील अनेक युवकांचा भाजपात प्रवेश

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob.. 9834024045

शनिवार 7 ऑगस्ट रोजी घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात घुग्घुस येथील कार्तिकनगर उडिया फैलातील अनेक युवकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे तथा भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला.

याप्रसंगी घुग्घुस येथील कार्तिक नगर उडिया फैलातील सोनू कोलगूर, साहिल जाल, संतोष काळबांधे, सुरेश बाघ, राजू काळबांधे, संदीप वाघमारे, सुरेंद्र दुर्गा, संजू जाल, अजय कोलगूर, शामराव काळबांधे, शैलेंद्र बाघ, अजित पिरबाका, रुद्र सेनापती व ब्रिजमोहन बाघ यांच्या गळ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपाच्या दुपट्टा टाकून स्वागत केले. प्रवेश घेणाऱ्या युवकांनी भाजपाचे कार्य घराघरात पोहचविण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा ग्रामपंचायत सरपंच किरण बांदूरकर, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, घुग्घुस भाजयुमोचे स्वप्नील इंगोले, अमोल थेरे, भाजपा नेते अजय आमटे, बबलू सातपुते, अनंता बहादे, भारत साळवे, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, असगर खान, अनिल मंत्रिवार, गणेश खुटेमाटे, गौरव ठाकरे, घुग्घुस प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, पायल मांदाळे उपस्थित होते.