लोकसंघर्ष मोर्चा तर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा*

*लोकसंघर्ष मोर्चा तर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा*

लोकसंघर्ष मोर्चा तर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा*
लोकसंघर्ष मोर्चा तर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा*

*मिडिया वार्ता न्यूज*
   *जळगाव जिल्हा प्रतिनिधी*
    ✒ *विशाल सुरवाडे* ✒

जळगाव-येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आज विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धरती आबा बिरसा मुंडा, भगवान एकलव्य, तंट्या मामा भिल आणि सर्व बहुजनांचे दैवत असलेले बळीराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिम संस्कृतीचे प्रतीक असलेला ढोल वाजविण्यात आला. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, नूतन मराठा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय भाऊ पाटील, बहुजन क्रांती मोर्चाचे खान्देश प्रमुख मुकुंद भाऊ सपकाळे, संजय मुरलीधर पवार, सचिन भाऊ धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रतिभाताई शिंदे यांनी, १९९२ ते २००२ हे दशक ‘आदिवासी दशक’ म्हणून जाहीर झाले. हे जगभरातील आदिवासी बांधवांच्या लढाईचे प्रतीक ठरले. याच काळात युनोला ‘जागतिक आदिवासी दिवस’ जाहीर करावा लागला. नैसर्गिक संसाधनांवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आदिवासी बांधवासाठी हे विशेष होते. लोकसंघर्ष मोर्चाच्या ‘आमु आखा एकसे’ या थीमवर आधारित आम्ही सर्व एक आहोत अशी हाक ‘युनो’ ने जगाला दिली, असल्याची आठवण प्रतिभाताई शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितली.
ज्या दिवशी माणसाला चंगळवादाचा फोलपणा लक्षात येईल त्या दिवशी आपली मूळ संस्कृती आणि जीवनशैली आठवेल तीच खऱ्या अर्थाने मानवी संस्कृती असेल व ती संस्कृती म्हणजे आदिवासी संस्कृती होय, त्यामुळे या संस्कृतीशी नटे जोडून घेतले पाहिजे, असे आवाहन संजयभाऊ पवार यांनी केले. मुकुंदभाऊ सपकाळे यांनी, या देशात बहुजनांच्या लढाईत आदिवासी नेतृत्व अग्रेसर असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी, माझ्या सर्व संघर्षाच्या लढ्यामध्ये आदिवासी बांधव प्रेरणास्थान आहेत आणि म्हणूनच मी संसाधन नसलेल्या, फाटक्या कपड्यात असलेल्या परंतु ताकदीने लढ़नाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांना डोळ्यासमोर ठेऊन वाईट प्रवृत्तीनशी लढा देतो, त्यांच्याकडूनन प्रेरणा घेतो, असे सांगितले.
लोकसंघर्ष मोर्चाचे सचिव सचिनभाऊ धांडे यांनी, आदिवासी, बहुजन, कष्टकरी, शेतकरी व मजुरांच्या कष्टाने निर्माण झालेला इतिहास कोणी बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कोणत्याही विघातक शक्तींना शक्य होणार नाही. आम्ही सगळे एकत्रितपणे या प्रवुत्तीविरुद्ध लढा देऊ व हा देश कुण्या एका समूहाचा नाही तर सर्वांचा दंश आहे हे सिद्ध करू, असे प्रतिपादन केले.
प्रकाश बारेला यांनी, दऱ्याखोऱ्यात राहणारा हा आदिवासी समाज आयुष्यभर स्वतःच्या हक्कासाठी लढाई लढत असतो. या लढाईमध्ये लोकसंघर्ष मोर्चा आणि प्रतिभाताईंनी आदिवासी बांधवांसोबत भक्कमपणे उभे राहून वनजमिनींचे पट्टे मिळाले पाहिजे यासाठी ऐतिहासिक लढा शासनाबरोबर दिला म्हणूनच आदिवासी बांधवांना पट्टे वाटप झाले. २०१८ मध्ये खावटी नको तर अनुदान पाहिजे असे म्हणत हायकोर्टात गेल्यावर उभारलेल्या लढ्यामुळे अनुदान वाटप करण्यास सरकारला भाग पडल्याची आठवणं बारेला यांनी केली.
लोकसंघर्ष मोर्चाचे भरत, कर्डीले, अजय तडवी, मोतीराम बारेला, ईश्वर पाटील, रायसिंग मोरे, फुलसिंग ब्रेल, सागर पाटील, कलिंदर तडवी इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचंड मेहनत घेतली.