*सरपंच महासंघ नागभीड तालुका अध्यक्ष पदी ठवरे यांची निवड*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
तळोधी (बा.)
आज मा.श्री.हेमराज लांजेवार जिल्ह्याध्यक्ष सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष तालुका नागभीड ची निवड करण्यात आली.
श्री. कमलाकर ठवरे सरपंच बाळापूर खुर्द उपस्थित सरपंचापैकी एकमताने निवड करण्यात आली.यावेळी हेमराज लांजेवार जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तर सरपंच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहणार असे याप्रसंगी कमलाकर ठवरे बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी मा.श्री. हेमराज लांजेवार होते तर सरपंच सेवा महासंघ चे उपाध्यक्ष श्री अमोलभाऊ बावनकार सचिव सौ. शर्मिलाताई रामटेके सहसचिव प्रशांत गायकवाड व कोषाध्यक्ष श्री. रोशन भाऊ रामटेके तसेच नागभीड तालुक्यातील सर्व सरपंच महोदय उपस्थित होते संचालन प्रशांत गायकवाड यांनी केले तर आभार सरपंच सीताराम मडावी सर यांनी केले.