सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक. — आमदार सुभाष धोटे.

सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक.
— आमदार सुभाष धोटे.

घरकाम करणाऱ्या महिला या कुटुंबाचाच एक भाग. - अविनाश जाधव - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा चा अभिनव उपक्रम. - 23 घरकाम करणाऱ्या महिलांचा केला सत्कार.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा :– संपूर्ण जिल्ह्यात दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान रानभाजी महोत्सव सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तहसील कार्यालय राजुरा येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. खोड, पाने, फळे, बिया, कंदमुळे, फुले यांचा वापर केला जातो. रानभाज्यामध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात. सुदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे. या महोत्सवात तालुक्यातील रानभाजी उत्पादक शेतकरी, शहरी व ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रानभाज्यांचे प्रकार, महत्त्व समजून घ्यावे व आपल्या दैनंदिन आहात त्यांचा समावेश करावा असे आवाहन केले. महोत्सव यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तहसीलदार हरिश गाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपसभापती मंगेश गरुनुले, प. स. सदस्य कुंदा जेनेकर, तालुका कृषी अधिकारी मकपल्ले, चंदनबाटवे तसेच निसर्ग शेतकरी महिला बचत गट पंचाळा येथील शेतकरी महिला तसेच परिसरातील रानभाज्या उत्पादक शेतकरी, नागरिक उपस्थित होते.