यूवा स्वाभीमान पार्टीतर्फे सूरज ठाकरे यांच्या कडून जोरदार शक्तिप्रदर्शन*

*यूवा स्वाभीमान पार्टीतर्फे सूरज ठाकरे यांच्या कडून जोरदार शक्तिप्रदर्शन*

यूवा स्वाभीमान पार्टीतर्फे सूरज ठाकरे यांच्या कडून जोरदार शक्तिप्रदर्शन*
यूवा स्वाभीमान पार्टीतर्फे सूरज ठाकरे यांच्या कडून जोरदार शक्तिप्रदर्शन*

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800

आगामी नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत तसेच विधानसभा निवडणुकीसाठी युवा स्वाभिमान पक्षातर्फे राजुरा येथे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे ह्यांच्या नेतृत्वात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर पक्षबांधणी करण्याच्या उद्देशाने विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश देखिल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की दिनांक:- ८/०८/२०२१ रोजी युवा स्वभिमान पार्टी चंद्रपूर तर्फे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे तथा नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. याला राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने व कामगारांनी तसेच तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत त्यांचे नेतृत्व स्वीकारत आगामी काळात होणार्‍या बदलाची चुणूक दाखवली आहे.

राजुरा येथिल सम्राट हॉल मधे झालेल्या ह्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. याप्रसंगी युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अमरावती येथील बडनेरा क्षेत्राचे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी पक्ष प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले तथा लाईव्ह च्या माध्यमातून मार्गदर्शन देखील केले व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे याप्रसंगी सांगितले. तथा जनतेवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभारलेल्या लढ्या मध्ये सुरज ठाकरे यांच्या पाठीशी सर्व ताकतीने आहोत हे देखील आवर्जून सांगितले आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये असलेल्या सिमेंट उद्योग व कोळसा खाणी यामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य न देऊ शकल्याने आजी-माजी व प्रस्थापित नेत्यांन बाबतची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. विधानसभा क्षेत्रात असलेल्या प्रत्येक उद्योगात परप्रांतीय लोकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा झाला असुन स्थानिक सुशिक्षित तसेच कुशल व अकुशल युवकांना रोजगार मिळत नसून बेरोजगारी वाढली आहे.

ज्या परप्रांतीय लोकांच्या बळावर उद्योग व्यवसाय करू पाहत आहे ते परप्रांतीय कोरोना काळात पळुन गेले होते व त्यावेळी शेवटी ह्या उद्योगांना टिकविण्यासाठी स्थानिक कामगारांचे श्रम कमी आले मात्र तरीही कोरोना निर्बंध कमी होताच उद्योगांनी पुन्हा एकदा आपले रंग दाखविणे सुरू केले असुन पुन्हा परप्रांतीय कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही, उद्योगांनी स्थानिकांना तत्काळ नोकरीत सामावून घ्यावे स्थानिक बेरोजगारी दूर करावी ह्यासाठी सुरज ठाकरे ह्यांनी दंड थोपटले आहे.

क्षेत्रातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील आजी माजी आमदार तसेच इतर नेते व पदाधिकारी स्थानिकांच्या प्रश्नावर मूग गिळून असुन त्यांना स्थानिकांच्या बेरोजगारी बद्दल कुठलाही कळवळा नाही किंवा त्यांना कुठलीही दूरदृष्टी नाही असा घणाघात सुरज ठाकरे ह्यांनी केला.

२००९ मध्ये सुरज ठाकरे यांना प्रस्थापित नेत्यांनी आपल्याला हलक्या मध्ये घेण्याची चूक केली होती. परंतु भविष्यात ते अशी चुक करणार नाही कारण युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातुन जनतेच्या सतत संपर्कात राहुन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कार्यरत राहु व आगामी विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करू असा आत्मविश्वास सुरज ठाकरे ह्यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केला.