सालबर्डी येथे महापुरात एक टाटा सुमो तसेच टू व्हीलर गेल्या वाहून

सालबर्डी येथे महापुरात एक टाटा सुमो तसेच टू व्हीलर गेल्या वाहून

सालबर्डी येथे महापुरात एक टाटा सुमो तसेच टू व्हीलर गेल्या वाहून

✍ *हर्षल राजेंद्र पाटील* ✍
📰 *मोर्शी तालुका प्रतिनिधी* 📰
📱 *8600650598* 📱

*हिवरखेड ( सालबर्डी )* *: -* हिवरखेड येथून जवडच असलेल्या सालबर्डी येथे 08/08/22 ला माळू नदीला महापूर आला गेल्या दोन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे मध्य प्रदेश च्या काही भागातून तसेच पहाडाचे पूर्ण पाणी माळू नदीच्या पात्रात येते आणि सालबर्डी येथून पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे काही महादेवाचे भक्त दर्शनासाठी भुयारात गेले असता अचानक पूर आला.

पुरामध्ये टाटा सुमो MH 28 V 3142 वाहून गेली आणि ही गाडी काही दूर पर्यंत वाहत गेली खडक खूप असल्या कारणाने गाडीचे संपूर्ण नुकसान झाले गाडीचा फक्त खाली ढाचा शिल्लक राहला पाणी पाहून सालबर्डी येथील नागरिक भारावून गेले.

05/08/22 ला पण असाच अचानक याच नदीला पूर आला होता त्यामध्ये पण टू व्हीलर काही गाड्या वाहून गेल्या होत्या त्यापैकी एक गाडी MH 27 BC 4222 ही गाडी भूषणभाऊ सुरेशरावजी वासनकर हिवरखेड येथील होती. आज आलेल्या महापुरा मुळे ही गाडी समोर आली आणि सालबर्डी येथील नागरीकांनी गाडी काढली आणि त्या गाडी मालकाला बोलावून परत केली अचानक महापुर आला यामुळे सर्व नागरिक तसेच महादेवाचे भक्त यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.