इंग्रजांच्या गुलामगिरीतुन देशाला मुक्त करण्या साठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्त अर्थात क्रांती दिन!
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
सन:1942 चाअखेर चा लढा देण्या चे महात्मा गांधींनी ठरवले. 8 ऑगस्त
1942 रोजी मुंबई च्या गोवालियाटँक
मैदानावर (ऑगस्त क्रांती मैदान )झालेल्या कॉंग्रेस च्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला चले जाव चा इशारा दिला. “लढेंगे या मरेंगे” ची घोषणा झाली आणि बघता बघता सारा देश पेटुन उठला.
त्याच रात्री गांधीजींसह सर्व मोठ्या नेत्यांना अटक झाली. हजारो, लाखो तरुणांनी यात भाग घेतला आणी सारा देश तुरंग बनला.
अनेक कार्यकर्ते भूमिगत ही झाले. पण दुसर्या दिवशी 9 ऑगस्तला मुंबई सह अनेक ठिकाणी जनक्षोभ उसळला.
स्वातंत्र्य सौदामिनी
ब्रिटीशांच्या जुलामाला न जुमानता अरुणा असफ अली या तरुणीने अखेर गोवालिया टँकवर तिरंगा फडकावला.
स्वातंत्र्याचा मंत्र
अधिवेशनात गांधीजींनी दिलेला”चले जाव”चा नारा स्वातंत्र्याचा मंत्र ठरला.
जुलमा चा कहर
निशस्त्र आंदोलकांवर ब्रिटिशांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुरा च्या नळकांड्या फोडल्या.
हा आहे 9 ऑगस्त चा महत्त्व अर्थात क्रांती दिन.