अन् मुलाच्या डोळ्यादेखत वाघाने घेतला त्याच्या वडिलांचा बळी; ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मन सुन्न करणारी घटना
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : – तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात वाघाने मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा बळी घेतला. ही घटना सोमवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुर्योधन जयराम ठाकरे (४९) असे मृताचे नाव आहे.
आरमोरी तालुक्यातील शिवनी येथील दुर्योधन ठाकरे यांची शेती ब्रम्हपुरी तालुक्यातील उत्तर
वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बेलगाव येथे आहे. सोमवारी ते आपल्या २० वर्षीय मुलगा आशीषसह शेतात गेले होते. मुलगा शेळीच्या चाऱ्यासाठी झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता झाडावर चढला. दुर्योधन ठाकरे खाली फांद्या जमा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्यांना फरफटत नेले. हे थरारक दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहणारा आशीष पूरता घाबरून गेला. दुर्योधन ठाकरे यांचा मृतदेह दक्षिण वनपरिक्षेत्राच्या हद्दीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.