ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हिरामण गोरेगावकर
मुंबई, ९ऑगस्ट: ज्येष्ठ सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यू मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आपल्या अभिनयानं त्यानं मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.