हिंगणघाट :- आज दि. ९ सप्टेंबर रोजी घरघुती वाढीव वीजबिला बदल ‘मनसे’चे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचा नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिलेसह अनेक कार्यकर्ते व जनता वाढीव वीजबिलाचा विरोधात रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा जाहीर निषेध केला लॉकडाऊन च्या काळातील वाढून आलेल्या वीजबिलबद्दल अनेक निवेदन देऊन सुद्धा यावर सरकारने ५ महिने ओलांडूनही कोणताही तोडगा काढला नाही यासाठी आम्ही आज मनसेच्या वतीने हिंगणघाट येथे रास्ता रोको आंदोलन केले। जर जिल्ह्यातील कोणाचाही घरातील वीजबिल कापली तर आम्ही विधुत कार्यालय फोडणार असे मत अतुल वांदिले यांनी या आंदोलनात मांडले।