वर्धा-वर्धिनींचा सामुहिक आत्महत्या करण्याचा ईशारा.

59

 

 

वर्धा :- वर्धा-वर्धिनी ताई यांचे मानधन त्वरीत देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन समता सैनिक दल वर्धा च्या वतीने मा.मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत पाठविण्यात आलेले आहे.
वर्धा जिल्हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा जिल्ह्यात सन २०११- २०१२ या वर्षापासून सुरू आहे. या अभियानाची मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे गरीबी निर्मूलन व महिला आर्थिक सक्षमीकरण करणे हे आहे.
सन २०१९-२०२० या वर्षात माहे नोव्हेंबर २०१९ पासून प्रत्येक जिल्ह्यात ४५ दिवसांच्या फेरीला जाण्यासाठी आम्ही वर्धिनींनी गटातून व ईतरांकडून कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे. त्या फेरीचे कोणत्याही वर्धिनीला मानधन मिळालेले नाही.कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व दुसरी फेरी करण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज घ्यावे लागत आहे.आतापर्यंत १० महिने होऊनही आम्ही मानधनापासून वंचित आहोत व अतिरिक्त कर्जाचा भार आमच्या डोक्यावर वाढतच आहे.
विशेष म्हणजे वर्धा-वर्धिनी मध्ये काम करणाऱ्या जास्तीत-जास्त महिला या अनुसूचित जाती-जमाती व ईतर प्रवर्गातील असून त्यात गरीब, गरजू,विधवा,घटस्फोटीत,एकल,
परितक्त्या यांचा समावेश आहे.
सध्या वर्धिनी ताईंना मानधन मिळत नसल्यामुळे त्यांना एकवेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण झाले आहे तर त्यांनी कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करावी? असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.
वास्तविकत: महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात कार्य करणाऱ्या वरिष्ठ व कनिष्ठ वर्धिनी यांचे मानधन देण्यासाठी रु.४,२१,६१,६२१/-(चार कोटी एकवीस लाख,एकसष्ठ हजार सहाशे एकवीस रुपये) ची तरतूद केलेली आहे. परंतु असे असतानाही नुकतेच मानधन न मिळाल्यामुळे व फेरीकरीता घेतलेल्या कर्जाची परतफेड न करु शकल्यामुळे भिडी येथील समता सैनिक दलाची कार्यकर्ती क्रांती दिघाडे या वर्धा-वर्धिनी ताईचा कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालयात दुर्दैवी म्रुत्यु झाला. या घटनेमुळे वर्धा-वर्धिनी च्या महिलांमध्ये रोष व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
तरी आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की वर्धा-वर्धिनी ताई यांच्या सोबत स्म्रुतीशेष क्रांती दिघाडे या वर्धिनी सारखा अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य तो निर्णय घेऊन त्यांना तत्काळ मानधन देण्यात यावे. अन्यथा सामुहिक आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरलेला नाही.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देताना समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप भगत, झलकारी संघटनेच्या अध्यक्षा स्मिता नगराळे,सुनील ढाले,महादेव शेंडे,प्रकाश जिंदे, वनिता नाईक,मनिषा आसरकर,जयाताई कांडगे,पुजा भगत, माया सोमकुंवर,अर्चना ताकसांडे,जयश्री गायकवाड,प्रिया बनसोड वर्धिनी ताई,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.