रातचांदना (सावरगढ) येथे जनावरांच्या लसीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम.

59

अनिल अडकिने सावनेर
मो. नं.9822724136
सावनेर-9 सप्टेंबर 2021
यवतमाळ येथील मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय व ग्रामीण कृषि कार्यानुभव प्रकल्प अंतर्गत रातचांदना (सावरगढ) येथे जनावरांच्या लसीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.बी.कोहळे सर,व कर्मचारी श्री.रा.म.मिरासे सर यांच्या उपस्थितीत जनावरांना होणारे आजार व रोग संसर्ग यांच्या धोक्यावर उपाय म्हणून लसीकरणाचे महत्व पटवून मार्गदर्शन शेतकऱ्यांना तसेच गावकऱ्यांना लाभले.
तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी मोनाली उद्धव कुंभारे हिने जनावरांच्या आहाराचे महत्त्व पटवून दिले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री. आर.ठाकरे सर,उपप्राचार्य श्री. मंगेश कडू सर.कार्यक्रमाचे अधिकारी शुभम सरप सर व प्राध्यापक लोखंडे मॅडम तसेच प्रगत शेतकरी श्री नारायण वेंडे यांची उपस्थिती होती.