Home latest News रायगड जिल्हा परिषद उर्दु शाळा तळा ( तालुका तळा ) या शाळेत...
रायगड जिल्हा परिषद उर्दु शाळा तळा ( तालुका तळा ) या शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा..
विश्वास गायकवाड मिडिया वार्ता बोरघर, माणगाव प्रतिनिधी ९८२२५८०२३२
बोरघर :- शिक्षक अर्थात गुरु, शिक्षक या शब्दाचे पृथक्करण केले तर शि म्हणजे शीलवान,क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष असा शिक्षक या शब्दाचा लौकिकार्थ केला जातो. गुरू शिष्याचे हे पवित्र नातं अनादी काळापासून अजरामर आणि सर्वश्रेष्ठ आहे. शिक्षण आणि शिक्षका वाचून जीवन व्यर्थ आहे. शिक्षक लहान अज्ञानी बालकांना तथा विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजून ज्ञानवंत आणि किर्तीवंत बनवत असतात, त्यामुळे शिक्षक हा राष्ट्राच्या संस्कारक्षम आणि प्रज्ञावंत भावी पिढीचा शिल्पकार असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण जगाकडे पाहण्याची सकारात्मक सम्यक दृष्टी शिक्षकांकडून आपल्याला प्राप्त होते. आपल्या देशाला असंख्य महान शिक्षकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ज्यांच्या महान शिक्षकी पेशामुळे आपल्या देशाने ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनेकविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि करत आहे. शिक्षकांच्या महान राष्ट्र निर्माण कार्याची जाणीव आणि त्यांच्या ज्ञान दानाच्या पवित्र कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. शाळा , महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ रोजी रायगड जिल्हा परिषद उर्दु शाळा तळा तालुका तळा या शाळेत शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात इयत्ता सहावी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अत्यंत हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला. या मध्ये प्रामुख्याने उमर मोह शब्बीर खान, शैझाद शादाब दुकानदार, आतिक आलताफ गोठेकर, मोहम्मद बशीर चिमावकर, तरबेज नईम गोलंदाज, खदीजा समीर रहाटविलकर, आयशा हनीफ गोठेकर, बूशरा शहीद पालेकर, आयशा इब्राहिम चिपळूणकर या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षकांची भूमिका अत्यंत उत्तमरीत्या निभावत शालेय अध्ययन आणि अध्यापनाचे धडे गिरवत शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक लियाकत राऊत, एजाज इनामदार, तैकीर नवरे, अ रहीम दळवी, मोहसीन पिरजादे इत्यादी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना जेवण आणि मिष्ठान्न गोड खाऊ देऊन शिक्षक दिनाच्या या शानदार कार्यक्रमाची उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात सुसांगता करण्यात आली.