ठाणे ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अपर्णा पवार भोईर यांची निवड*

60

*ठाणे ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अपर्णा पवार भोईर यांची निवड*

प्रतिनिधी – पुरोगामी विचार घेऊन महिला व विद्यार्थी मध्ये अनेक सामाजिक कामात कार्यरत अग्रेसर असलेल्या मुरबाड तालुक्यातील अपर्णा पवार भोईर यांच्या सामाजिक,शैक्षणिक कामाची माहिती घेऊन राष्ट्रवादीच्या महिला प्रमुख खा.सुप्रियाताई सुळे,अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,व सक्षणताई सलगर यांनी त्यांच्यावर ठाणे जिल्हा ग्रामीण महिला उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
त्यांच्या निवडीमुळे ठाणे ग्रामीण महिला मध्ये चैतन्य असे वातावरण तयार झाले त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अपर्णा पवार भोईर यांनी अनेक सामाजिक विषय हाताळले आहेत. त्यामध्ये आदिवासी महिला व शालेय ,महाविद्यालयीन विद्यार्थी , विद्यार्थिनी प्रश्न यांचा जवळचा संबंध आला आहे. याबाबत त्यांच्याशी बोलताना
त्यांनी पुढे सांगितले माझी वाचनाची आवड वाढत गेली. यातून अनेक राजकीय विचारवंतांचा माझ्यावर प्रभाव पडत गेला. महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनात रुजत गेले. याच कालखंडात एका व्यक्तीने मनावरती प्रचंड प्रभाव पाडला ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु. त्यांची धोरणे या आपल्या भारत देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात ही खात्री वाटू लागली. त्यामुळे साहजिकच काँग्रेसी विचार मनावर होत गेला.
परंतु माझा स्वभाव हा प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहण्याचा आहे. प्रचंड संघर्ष करण्याचा व त्यावर मात करण्याचा माझा स्वभाव राहिला आहे. त्यामुळे मी श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराकडे झुकली गेले. या व्यक्तीकडून उद्याचा भारत मला दिसू लागला. प्रचंड इच्छाशक्ती, कामावरची निष्ठा, संयमपणा आणि प्रत्येक विषयाबद्दल आपली भूमिका तसेच महत्वाचा म्हणजे मला आवडलेला गुण म्हणजे सतत लोकांत राहणे याच गोष्टीने माझ्या मनावर गारुड केले.
याच काळात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानशी माझा संपर्क झाला व कर्तृत्ववान बापाची कर्तृत्ववान मुलगी संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्याशी संपर्क झाला व माझा विचार पक्का झाला. आत्ता आपण सामाजिक करण्याबरोबरच राजकीय कार्यात स्वतःला झोकून द्यायचे. अशातच माझी माऊली व माझ्या राजकीय पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणारी आमच्या जेष्ठ नेत्या सौ. विद्याताई वेखंडे यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्ह्याची(ग्रामीण) जबाबदारी माझ्यावरती आली. मी सर्वांना आश्वस्त करते की येणाऱ्या काळात पुरोगामी विचार व महिला सक्षमीकरणासाठी झटलेल्या पदमश्री आदरणीय शरद पवार साहेब यांचे विचार तळागाळातील जन सामान्यांपर्यंत पोचवण्याच काम प्रामाणिक पणे करेल. येणारा काळ हा फक्त महिला युग असेल हे आज खात्रीपूर्वक सांगू इच्छिते.
मला या कार्यासाठी आमचे नेते श्री. मनोज प्रधान साहेब ,श्री. महेश तपासे साहेब , श्री. संजय बोरगे साहेब ,सक्षणाताई सलगर , आदीतीताई नलावडे , स्वातीताई माने , श्री. निरंजन कुलकर्णी सर , हर्षल जोशी सर ,मंगेश खराटे सर ,अजित खराडे सर , महेश फाटक सर , सहदेव जिगे ,भीमराव धुळप ,विजय दळवी व श्री .सचिन रोकडे सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. मी शतशः या सर्वांची आभारी आहे.