आपल्याच नातीवर अत्याचार करून आजोबाची आत्महत्या
बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालूक्यातील कदमापूर गावात नात्याला आणी माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. खामगाव तालुक्यातील ५५ वर्षीय आजोबाने ५ वर्षे वयाच्या चिमुकल्या नातीवर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली.
हातून नातीवर अत्याचार झालेल्या घटनेमुळे समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी आजोबानेही गळफास घेवून आत्महत्या केली.
कदमापूर येथे ५ वर्षीय मुलगी मैत्रीणींसह खेळत असताना तिच्या चुलत आजोबाने तिला घरात नेवून अत्याचार केला. चिमुकलीने घडलेला प्रकार सायंकाळी आई-वडिलांना सांगितला.
यानंतर याप्रकरणात खामगाव येथील ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादविच्या कलम ३७६ (२) (आय) ४, ६ बाल लैंगिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडित मुलगी व तीचे आईवडील पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले ही माहिती कळताच आरोपीने निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. बदनामी पोटी आरोपीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रफीक शेख यांच्या मार्गदर्शनात एपीआय शेवाळे हे करीत आहेत.