गुरुदेव भक्तानी आपल्या गावीच राष्ट्रसंतांना श्रद्धांजलीअर्पावी गणेश बोथे पाटील यांचे आवाहन.

69

गुरुदेव भक्तानी आपल्या गावीच राष्ट्रसंतांना श्रद्धांजलीअर्पावी गणेश बोथे पाटील यांचे आवाहन.

विनायक सुर्वे प्रतीनिधी

गुरुकुंज;-  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५१वा पुण्यतिथी महोत्सव ३० आँक्टोबर ते ०६ नोहेंबर पर्यंत श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी आश्रम येथे नियोजित करण्यात आला होता परंतु ,राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व धार्मिक स्थळे यावरील शासनाची कायम असलेली बंदी यामुळे गुरुदेव भक्तांनी यावर्षी त्यांच्या गावातच राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते गणेश नारायणराव बोथे यांनी केले आहे श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या गुरुकुंज आश्रम येथील केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी ही माहिती दिली .राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात विविध गावातुन गुरुदेव सेवामंडळाचे कार्यकर्ते पालखी पदयात्रा काढुन गुरुमाऊलीला अभिवादन करण्यासाठी श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे येतात .परंतु .यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुरुदेवभक्तांना श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे पालखी पदयात्रेस मनाई करण्यात आली आहे.तसेच गुरुकुंज आश्रमात यावर्षी गुरुदेव भक्त व पालखी पदयात्रेसाठी अन्नदानाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही .मौन श्रद्धांजलीच्या कार्यमाला गुरुमाऊलीला अभिवादन करण्यासाठी लाखो भाविक आश्रमात उपस्थित राहतात .त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे न येता श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या कार्यकत्यांनी व गुरुदेवभक्तांनी ५ नोहेंबरला दुपारी ४वाजून ५८ मिनिटांनी आपल्या गावातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करावी .कोरोना या आजाराचा मानवी जीवानान काय परिणाम होत आहे .या विषयी जनजागृती करावी ,हीच राष्ट्रसंतांना श्रद्धांजली ठरणार आहे असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते गणेश नारायणराव बोथे यांनी केले आहे ,