अडसर ठरल्याने प्रेमीकेच्या भावाचा केला खून

52

अडसर ठरल्याने प्रेमीकेच्या भावाचा केला खून.

नागपूर :-  बहिणीला त्रास देणाऱ्या टवाळखोराला समज देत तिच्या मागे लागू नको, असे सांगितल्या मुळे त्या टवाळखोराने प्रेमीकेच्या भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. धीरज याचे बंटी याच्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत बंटी याला कळाले. दहा दिवसांपूर्वी बंटी याने धीरज याला मारहाण केली. त्याच्या मोबाइलमधून बळजबरीने चुलत बहिणीचा मोबाइल क्रमांक डिलिट केला. यानंतर बहिणीला भेटल्यास ठार मारेल, अशी धमकी धीरजला दिली. बंटी हा आपल्याला ठार मारेल, अशी भीती धीरज याला होता. त्यामुळे गत आठ दिवसांपासून धीरज हा बंटीचा काटा काढण्याचा कट आखत होता.
बंटीची हत्या करण्यासाठी टवाळखोर आरोपीने बंटीला फ़ोन करुन बोलला तुझ्या बहिणीचे काही व्हिडीओ दाखवायचे आहे असे सांगून कट करून शेतात एकटे बोलावले. नंतर त्याची हत्या करून दुचाकीला प्रेत बांधून दुचाकी विहिरीत ढकलून दिली होती.

बंटीने जाण्यापुर्वी ही बाब गावातील आपल्या नातेवाईकाला सांगितली होती. आधीच धीरजच्या कृत्याने त्रासलेल्या चिडाम कुटुंबाने बंटीला एकटा कुठेच जाऊ नको असे सांगितले होते. मात्र, बहिणीच्या अब्रूसाठी चिंतीत झालेला बंटी एकटाच गेला आणि त्याचा घात झाला.
बंटी हत्याकांड प्रकरणात हिंगणा पोलिसांनी मारेकरी धीरज झलके (वय २३) याला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने धीरज याची १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणाचा तपास हिंगणा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिन दुर्गे करीत आहेत.