पत्नीला विकले 10 हजार रुपयांत, त्यानंतर घडल भयानक.

50

पत्नीला विकले 10 हजार रुपयांत, त्यानंतर घडल भयानक.

देहरादून:- एका नराधम पतीने आपल्या पत्नीला 10 हजार रुपयांना विकल्यानंतर खरेदीदाराने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. रुद्रप्रयागमध्ये ही घटना घडली. पती मजूर आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पती विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
रुद्रप्रयागचे पोलीस अधीक्षक नवनीत भुल्लर यांनी सांगितले की, पतीने त्याच्या पत्नीला नेपाळच्या एका व्यक्तीला 10 हजार रुपयांना विकल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले. आम्ही आरोपी पतीला अटक केली आहे. तर खरेदीदार व्यक्ती फरार आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, महिलेवर 26 सप्टेंबरला तिच्या पतीसमोरच खरेदीदाराने बलात्कार केला. तुला या व्यक्तीला विकले असून, याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर भयानक परिणाम होतील, असे धमकावले.
या प्रकरणी पोलिसांनी गुप्तकाशी येथे राहणाऱ्या आरोपी पतीविरोधात कलम 506, 332, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर महिलेवर बलात्कार करणाऱ्या नेपाळमधील आरोपीविरोधात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.