ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाच्या मागणीला यश.

ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाच्या मागणीला यश.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने केले निदान केंद्रांचे तात्काळ उद्घाटन.

ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाच्या मागणीला यश.
ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या मागणीला यश.

✒️ संजय कांबळे ✒️
सांगली जिल्हा प्रतिनिधी
9890093862
सांगली,दि.9ऑक्टोबर:- ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवार दि.1 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकारी व आयुक्त सां.मि.कु.मनपा यांना निवेदन देण्यात आले होते. सदर निवेदनात म्हटले होते, महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मनपा क्षेत्रात डेंग्यू तसेच इतर साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे होणाऱ्या उपचार खर्च व डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया या सारख्या डासाच्या उत्पत्ती पासून होणाऱ्या आजाराची तपासणी महानगर पालिकेच्या खर्चाने करण्यात यावी. या मागणीचा पाठपुरावा सतत अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत होता. तरी या मागणीचा विचार करून तात्काळ मनपा प्रशासनाने त्रिकोणी बागेत निदान केंद्रांचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील व डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते केले. या निदान केंद्रामुळे एकाच छताखाली ६३ वेगवेगळ्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाच्या मागणीला यश.शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकन गूनिया, कावीळ बी आणि सी, बेडका तपासणी, ईसीजी, गुप्तरोग तपासणी, गर्भधारणा तपासणी आदी तपासण्या खासगी लॅबच्या तुलनेत सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे म्हणाले, मनपा आयुक्त यांनी आमच्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ निदान केंद्राचे उद्घाटन केले बद्दल त्यांचे आभार मानतो. नागरिकांनी या निदान केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. येणाऱ्या काळात देखील वंचित बहुजन आघाडी व अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाच्या वतीने गोरगरिब श्रमिक कष्टकरी जनतेच्या नागरी सुविधा व हितासाठी लढा सुरू राहील अशी ग्वाही दिली.