घुग्घुस येथील आंबेडकर नगर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु.

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
घुग्घुस:- शनिवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता घुग्घुस येथील आंबेडकर नगर वार्ड क्रमांक 5 येथील समुदाय सभागृहात 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. 200 कोविशिल्ड लसीचा साठा या केंद्रात उपलब्ध होता. सकाळी 9 वाजता पासून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. येथील वार्ड वासियांनी याठिकाणी लसीकरण केंद्र देण्याची मागणी केली होती. दरम्यान घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्षीया जुही यांनी लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना कोविड लसीकरणा बद्दल जनजागृती करीत माहिती दिली.
