तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू, गोंडपीपरी येथील घटना.
राजु राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- येथील वनविभागाच्या डेपोलगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुण पाण्यात बुडाला. तलावाजवळ असलेल्या नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना त्याचा जीव वाचवता आला नाही. शुभम वामन सातपुते (रा. भगतसिंग चौक) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ९ सकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, गोंडपिपरी येथील तलावात पहाटे अनेक जण पोहायला जातात. शुभम सातपुते देखील कधीकधी पोहायला जात होता. तो पोहण्यात तरबेज नव्हता. शरीराला प्लॅस्टिकच्या बॉटल लावून तो पोहोत होता. शनिवारीही तो तलावात पोहोण्यासाठी गेला. मात्र, तो तलावात बुडाला. यावेळी साठ ते सत्तर लोक तलावात पोहत होते. युवक पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. शुभमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सध्या पोलिस शुभमच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. शुभम हा आरएसएसच्या शारीरिक शाखेचा तालुका प्रमुख होता. एका युवा तरुणाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.