बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दुर्दैवी घटनेने हळहळ*
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दुर्दैवी घटनेने हळहळ*

*बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दुर्दैवी घटनेने हळहळ*

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दुर्दैवी घटनेने हळहळ*
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दुर्दैवी घटनेने हळहळ*

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
जातेगाव / उमापूर : प्रतिनिधी
गोदावरी नदीच्या पात्रात दोन जेष्ठ नागरिक जात असताना यावेळी अचानक वीज पुरवठा करणारी विद्यूत तार अंगावर पडली. यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी भोगलगाव येथे घडली. धोंडीराम रामा कांबळे(वय ६५ रा. भोगलगाव ता. गेवराई) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. तर राणोजी खरात हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरी घटना काल तळणेवाडी येथे घडली असून यामध्ये एका 20 वर्षीय युवकाचा विद्यूत मोटार बंद करत असताना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथील राणोजी खरात आणि मयत झालेले धोंडीराम कांबळे हे दोघे आज शुक्रवार दि.८ रोजी गोदावरी नदीच्या पात्रात आघोंळीस जात होते. यावेळी वीज वाहिनीची तार अचानक दोघांच्या अंगावर पडली. यात धोंडीराम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर राणोजी खरात गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत तलवाडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असल्याची माहीती सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी दिली.

तसेच दुसरी घटना तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली आहे. येथील दिपक भाऊसाहेब गायकवाड (वय 17 वय) हा शेतात विद्यूत मोटार बंद करण्यासाठी गेला असता या युवकाचा विजेचा जबर शाँक लागून दुर्देवी मृत्यू झाला. या दोन्ही घटनेने तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, वीज पुरवठा करणा-या लोंबकळत चाललेल्या तारा आणि जीर्ण झालेल्या तारा याकडे महावितरण कडुन दुर्लक्ष होत असल्याने भोगलगाव येथील वृध्द धोंडीराम कांबळे यांचा बळी गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मागील आठवड्यात रेवकी येथील तरुणाचा अशाचप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here