हिंगणघाट शहरातील असंख्य युवकांनी केला भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश.
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट,दि.09:- हिंगणघाट शहरातील मोठ्या संख्येने दिनांक 08 ऑक्टोबरला युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश केला. हिंगणघाट शहराला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी युवकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी भाजयुमो उत्तम कार्य करेल, हा विश्वास ठेवत आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. अंकुशजी ठाकुर व भाजपा जिल्हा महामंत्री किशोरजी दिघे, नगरसेवक सौ. रविला आखाडे, शिवाजी आखाडे, भाजयुमो शहर अध्यक्ष सोनु पांडे यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश केला. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, केंद्रात ३०० पेक्षा जास्त खासदार घेऊन राष्ट्रीय हिताला महत्त्व देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तास्थानी आहे. अशा ताकदवान पक्षात युवकांचा इन्कमींगचा अखंड झरा सुरूच आहे.
शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आमदार समिरभाऊ कुणावार यांनी युवकांनचे अभिनंदन केले. युवकांच्या मदतीसाठी व विकासासाठी सदैव भाजयुमोच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे सांगितले. किशोरजी दिघे व अंकुशजी ठाकुर यांनी युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी गजानन हटवार, कुणाल राऊत, मयुर भोयर, अक्षय गिरडे, शेखर माटेवार, राहुल भोपळे,वैभव ढगे, भुषन चौधरी,सारंग भट, शंकर मोरे, सचिन मोरे, रवी मोरे, अमित मोरे, अमोल कोल्हे, अखिल काळे, विशाल भरतपुरिया, नेहाल केखरे, शिवकुमार राऊत, ऋषीकेश काकडे, अक्षय भरतपुरिया, मोहित शेंडे, मोहम्मद इजराईल, अविनाश मोरे, कुनाल रघाटाटे, आकाश मोरे, पवन येरगुंडे, तरूण अोस्तवाल आदींसह इतर असंख्य कार्यकर्त्यांनी भाजयुमो प्रवेश केला.
या प्रसंगी भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, भाजयुमो शहर अध्यक्ष सोनु पांडे, उपाध्यक्ष भुषण आष्टनकर, संघटन महामंत्री गौरव तांबोळी, महामंत्री अतुल नंदागवळी, स्वप्निल शर्मा, लिलाधर मांडवकर, मुकेश सिसोदिया, तुषार हवाईकर, नितीन नांदे, सोशल मीडिया प्रमुख योगेश्वर जिकार, राहुल नवघरे, लखन नागापुरे, सचिव रितिक दांडेकर, निखिल हिवंज, अक्षय हारघोडे, निरज सैनी, बाबु चौहान, बाबु सतेजा, संपर्क प्रमुख सुरज युवनाथे, तुषार येनोरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.