मानव संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हाअध्यक्ष पदी शशिकांत त्र्यंबक दुसाने यांची निवड.
ईसा तडवी
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
जळगाव:- मानव संरक्षण समिती नवी दिल्ली रजि.भारत सरकार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत विजयजी कुराडे यांचे आदेशानुसार तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा राज्याचे जनसंपर्क अधिकारी श्रीयुत गजाननजी भगत यांच्या शिफारशीनुसार आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीयुत शिवाजीराव पाटील यांच्या वतीने पाचोरा तालुका अध्यक्ष श्री.शशिकांत त्र्यंबक दुसाने यांचा समाजसेवेचा आणि समितीच्या विकास कामासाठी केलेला विस्तारयुक्त कामाचा आढावा घेऊन त्यांना पाचोरा तालुका अध्यक्ष या पदावरून त्यांची पदोन्नती (प्रमोशन) करून जळगांव जिल्हा अध्यक्ष या पदी नियुक्ती करण्यात आली.याबद्दल मानव संरक्षण समिती नवी दिल्ली रजि. भारत सरकार यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.