शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपयाची मदत द्या: नेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी.
मनसेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
✒प्रणिल जाधव✒
नेर तालुका प्रतिनिधी
9689330960
नेर:- यवतमाळ जिल्हात सततच्या पावसाने कहर केला असुन शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे शासनाने नेर तालुका ओला दुष्काळ ग्रस्त जाहीर करून 50000 रुपये मदत देण्यात यावी यासाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवुन मागणी केली.
नेर तालूक्यात सतत पडणारा पावसामुळे शेतकर्यांची स्थिती शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने अधिकच बिकट झालेली आहे तसेच तालूक्यात पावसाने थैमान घातल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
एका दाण्याचे हजारो दाणे निर्माण करणारा बळीराजा अस्मानी संकटामुळे चक्र व्यूहात सापडलेला आहे व त्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे दिवाळीचा सण जवळ आला असताना उभ्या सोयाबीन मध्ये पाणीच पानी झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून येणारे सण कसे साजरे करायचे याची चिंता लागलेली आहे. ज्या पिकाच्या भरवश्यावर कर्ज घेतले तेच पीक पाण्याखाली आल्याने आता कसे होणार? हा मोठा प्रश्न बळीराजा पूढे उभा आहे. या गंभीर परिस्थिती मध्ये आता शासनाने आधार म्हणून सरसकट कर्जमाफी, हेक्टरी 50 हजार रुपए मदत व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका नेरच्या वतीने निवेदनातून केली.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कठाळे, शहराध्यक्ष प्रफुल गणोरकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रणिल जाधव, अनुप ठाकरे, रोशन राठोड यांच्या सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.