वणी तालुक्यातील पिलकी वाढोनात पादन रस्त्याची दुर्दशा प्रशासनाने कुंभकर्नीय झोपेत.
15 दिवसामध्ये प्रशासनाने लक्ष दिले नाही तर पिलकी वाढोना ग्रामवासी आमरण उपोषणाला त्या चिकला मध्ये बसणार त्यांचा इशारा दिला आहे.
नितेश पत्रकार (NT)
वणी तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
मो,नं, 7620029220

वणी (पि, वाढोना)दि,8 ऑक्टोबर:- वणी तालुक्या मध्ये येणाऱ्या पिलकी वाढोना या गावाची खूप दुर्दशा होऊ न आहे अशे पिलकी वाढोना ग्रामवासी यांनी मिडीया वार्ता न्यूज तालुका प्रतिनिधी नितेश पत्रकार याना म्हटले आहे.
पिलकी वाढोना या गावांमध्ये जाण्या साठी पादन रस्ता आहे पण त्या पादन रस्त्यामध्ये चिकल असल्यामुळे शेतकऱ्यांना जाता येत नाही की साधारण बैल बंडी जाता येत नाही. आता शेती चे कामे चालू आहे त्या ठिकाना वरून बैल बंडी न्यावी लागते पण काही ठिकाणी चिकल खूप असल्यामुळे बैल बंडी त्या ठिकाणी पसली असता त्या मुळे शेतकरी बैल बंडी नेत नसते व शेतकऱ्यांचे हाल होऊन राहले अशे शेतकऱ्यांचे म्हणणे दिसून येत आहे, तरी प्रशासनाने या कडे लक्ष देऊन त्या पादन रस्ता चे दुरुस्ती करून देण्यात यावे अशे पिलकी वाढोना या ग्रामवासीयांचे म्हणणे दिसून येत आहे. 2018 ते 2019 मध्ये पादन रस्ता दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी JCB आली असता पण त्या रस्ता काही कारणाने रोखण्यात आला अशे त्या पादन रस्तानी जाता येता नागिररीकांचे म्हणणे दिसून येत आहे.
पिलकी वाढोना यागावा मध्ये आरो मशीन येऊन आहे पण त्या आरो मशीन चालू करण्यात आली नाही. जवळपास 7 ते 8 महिने होऊन गेले पण त्या आरो मशीनला चालू करण्यात आले नाही. पिलकी वाढोना ग्रामवासी त्या आरो मशिन केव्हा चालू होते आणि कोण चालू करणार हे नागरिकांच्या तोंडा बाहेर शब्द निगुण राहले. परंतु याकडे कुणी ही लक्ष देत नसल्यामुळे गावकरी सताप जनक व्यक्त करत आहे. पिलकी वाढोना या गावचे नागरिक 2 किमी अंतरावरून आरो मशीनचे पाणी आणून पित आहे परंतु या कडे कुणीही लक्ष देत नाही. या मध्ये दोषी कोण आणि या कडे लक्ष कोण देणार या कडे गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
गावामध्ये अंगणवाडी आहे पण शिक्षिका नाही. गाव आहे पण पुलीस पाटील नाही. तंटामुक्ती अध्यक्ष नाही खूप बिकट परिस्तिथी येऊन आहे. पिलकी वाढोना या ग्रामवासीयांची याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. अशे पिलकी वाढोना या गावचे नागरिक म्हणून राहले.