समुद्रपुर शहर झाले प्रकाशमय, आमदार समिर कुणावार यांचे उपस्थितित समुद्रपुर येथे स्ट्रीटलाइट्सचे लोकार्पण.
✒आशीष अंबादे ✒ वर्धा जिल्हा प्रतिनिधी 8888630841 हिंगणघाट/समुद्रपुर दि.09:-विधानसभा क्षेत्रातील महत्वाचे शहर असलेल्या समुद्रपूर येथे आमदार समीर भाऊ कुणावर यांच्या प्रमुख उपस्थितित स्ट्रीटलाइटचे लोकार्पण संपन्न झाले.
काल दि.८ रोजी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांचे प्रमुख उपस्थितित समुद्रपूर येथील 80 वर्षीय जेष्ठ नागरिक भाऊराव बावणे यांचे शुभहस्ते बटन दाबताच संपूर्ण समुद्रपूर शहर प्रकाशमय प्रकाशाने उजळून निघाले. गेल्या अनेक दिवसापासून शहरातील सिमेंट रोडचे काम पूर्ण होताच रस्त्याचे मध्यभागी स्ट्रीट लाईट बसविण्यात आले.
स्ट्रीटलाइट्समुळे समुद्रपूर शहराला एक आगळेवेगळे सौंदर्य प्राप्त झाले असून नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून काल दिनांक ८ रोजी समुद्रपूर येथील अनेक नागरिकांच्या साक्षीने तसेच आमदार समीर भाऊ कुणावर यांच्या विशेष प्रयत्नाने सदर काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये स्ट्रीट लाईटच्या प्रत्येक पोलच्या अंतराने पोलवरती सिरीजसुद्धा लावण्यात आली असल्याने समुद्रपूर नगरीला आगळेवेगळे स्वरुप प्राप्त झाले असून सदर परिसर उजळून निघाला असल्याचे दिसुन येत आहे.
अनेक वर्षानंतर एखादी व्यक्ती समुद्रपूर येथे आली असता त्यांना समुद्रपूर आहे की काय असा प्रश्न पडेल असे समीर भाऊ कुणावर यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. यापुर्वी आमदार समीर भाऊ कुणावार यांनी समुद्रपूर शहरात रोड, नाल्या, उद्याने तसेच बायपास रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, मटन मार्केट, समुद्रपूर येथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, ओपन जिम अशी विकासकामे केली असल्याने तसेच आता स्ट्रीटलाइटच्या माध्यमातून समुद्रपूर शहर प्रकाशात न्हाऊन निघाले असल्याने येथील नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
समुद्रपूर शहराचा संपूर्ण विकास करीत असताना नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष तसेच संपूर्ण नगरसेवक यांनी आ.समीर भाऊ कुणावार यांना वेळोवेळी सहकार्य केल्यानेच हे शक्य झाले असल्याचे आमदार समिर कुणावार यांनी सांगितले. समुद्रपूर शहरामध्ये ज्यांनी वयाचे 35 वर्षे घालविले असे भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे यांचा सुद्धा विकास करण्यामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन आ.कुणावार यांनी याप्रसंगी केले. स्ट्रीट लाईटचे लोकार्पण कार्यक्रमाचेवेळी प्रामुख्याने नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, माजी नगराध्यक्षा शीला सोनारे, उपाध्यक्ष वर्षा बाभुळकर माजी नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेते मधुकर कामडी, माजी नगरसेवक राजाभाऊ उमरे, माजी नगरसेवक पंकज बेलेकर, माजी नगरसेवक प्रवीण चौधरी, माजी नगरसेविका सौ. ताराबाई आडवे, माजी नगरसेविका इंदुबाई झाडे, माजी नगरसेविका सुषमा चिताडे, माजी नगरसेविका सरिता लोहकरे, माजी नगरसेविका वनिता कांबळे, माजी नगरसेवक अंकुश आत्राम यांचेसह समुद्रपूर येथील माजी सरपंच रमेश भोयर, प्रा. मेघशाम ढाकरे, श्रीकांत महाबुधे, पत्रकार सुधीर खडसे, शांतीलाल गांधी, बादल वानकर, प्रफुल कुडे, कृष्णा धुळे मनिष गांधी, राम काळे, अमोल हिंवज, अक्षय उमाटे, अनिल बावणे, गणेश लाखे, राजू बावणे, नुरलखा पठाण, जयकिशोर मोरे, मंगेकर बाबू, नामदेवराव अडकिने, हिवसे गुरुजी, रफाभैय्या, राजू वानखेडे, नथुजी रोडे, सुधिर शेंडे, सुधाकर बाभुळकर, प्रसाद पंत,सतीश ठाकरे, विठ्ठलराव भोयर, राजू भोसले, गजानन पवार, नितीन बावणे, प्रकाश शिंदे, गजानन वाघमारे, देवरावजी खोब्रागडे, अंकुश खुरपडे, मिलिंद गजभिये, सोपान पवार, शालीकराव दळणे, महादेव पेंदे, शंकरराव घुमडे, समुद्रपूर शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा समीक्षा मांडवकर, गुलाबराव छापेकर, गुलाबराव खंडाळे, शारंगधर वेरुळकर, संजय बेले तसेच गावातील अनेक गणमान्य नागरिक व रोडचे कॉन्ट्रॅक्टर राजाभाऊ मॅडमवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत धमाने, पोफळे व इतर सन्माननीय नागरिक नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून मनपूर्वक आभार मानले.