नायगांव विधान सभेत तृतियपंथी रेखा देवकर यांची निवडणुकीत पुर्ण ताकतीने उतरण्याचा. मतदार संघात पहिल्यांदाच प्रवेश
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
अशोक वाघमारे
मो 8010874742
नांदेड :- नायगांव विधानसभा मतदार संघात अनेक पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवारांनी निवडणुकी साठी गुडघ्याला बाशिंग बांधून आपआपल्या परिणे भेटी गाठी सुरू केल्या असून यातच नायगांव येथील एका तृतियपंथी रेखाताई देवकर यांनी सुध्दा या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी पुर्ण ताकदीने कंबर खचुन जनतेमध्ये चर्चा करतांना दिसु लागल्याची कुजबुज ऐकावयास येत आहे. नायगांव विधानसभा मतदार संघात ईच्छुक
उमेदवारांनी मतदारांच्या गावो गावी जाऊन भेटी गाठी घेत असल्याचे पहावयास मिळत आहे यातच नायगांव येथील रहिवाशी असलेल्या तृतीयपंथी रेखाताई देवकर यांनी सुध्दा या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आपली कंबर कसल्याचे बोलले जात आहे.या निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी आपल्या सामाजीक कार्य पुढे केले आहे. देशाच्या संविधाना नुसार आम्हा तृतियपंथाला सुध्दा निवडणुकीत उभा राहण्याचा अधिकार असल्याचे देवकर यांनी सांगितले. विधान भवनात जाण्याच्या भावना आमच्या सारख्या तृतियपंथ्याच्या हि असु शकतात असे हि रेखा देवकर यांनी सांगितले. या करिता मि आपल्या प्रत्येक्ष भेटी घेणारच असुन नायगाव उमरी धर्माबादच्या सर्व मतदारांना विनंती करते की, आज पर्यंत तुम्ही अनेक मातबरांना मतदान केलात आतापर्यंत सर्व जणांनी आप आपली पोळी भाजुन घेतले आहेत अशा धावपळी केल्याचे आपण पाहिले आहे म्हणुन या वेळी त्यांना त्यांची जागा दाखावावी. परंतु या वेळी मला एक वेळेस मतदानच्या रूपाने आशीर्वाद देऊन माझ्या पाठीशी खंबीर पणाने उभे राहावे अशी कळकळीची विनंती आशाताई देवकर यांनी केले आहे.