४४ ओबीसी शासकीय वस्तीगृह सुरु झाल्याचे समाधान : डॉ. अशोक जीवतोडे
• लवकरच ७२ ओबीसी वसतिगृहांची मागणी पूर्ण करु; ओबीसी हितासाठी कटिबध्द : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• महाराष्ट्रातील ७२ पैकी ४४ ओबीसी शासकीय वस्तीगृहाचे लोकार्पण संपन्न
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 10 ऑक्टोंबरआता विविध घटकांमध्ये सर्वात जास्त वसतिगृह ओबीसींचे सुरू आहे, लवकरच ओबीसींच्या ७२ शासकीय वसतिगृहांची मागणी पूर्ण करु, तरुणाई स्वतःच्या पायावर उभी राहावी, यासाठी वसतिगृह उपयोगी ठरतील. ओबीसी करीता सर्वाधिक ४८ शासन निर्णय माझ्या कारकीर्दीत निघाले, याचे मला समाधान आहे. हे सर्व ओबीसी समाज पाठीशी असल्यामुळे करु शकलो, मी ओबीसी हितासाठी कटिबध्द राहील, असे ४४ शासकीय वसतिगृहांच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण मुलां-मुलींच्या ४४ शासकीय वसतिगृहांचा लोकार्पण सोहळा ९ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथील वर्धा रोड वरील मेट्रो स्टेशन सभागृहात संपन्न झाला. सदर उद्घाटन सोहळा इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याचे उद्घाटक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख अतिथी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे उपस्थित होते. यासह नागपूर विभागातील विविध आमदार उपस्थित होते.
ओबीसी संघटनांच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांकरिता राज्य सरकारतर्फे शासकीय वसतिगृह सुरु करण्यात यावे, अशी मागणी होती. या मागणीला यश आले असुन मागणी असलेल्या ७२ वसतिगृहापैकी ४४ शासकीय वसतिगृह भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती सरकारतर्फे लोकार्पित करण्यात आली.
४४ ओबीसी शासकीय वस्तीगृह सुरु झाल्याचे समाधान डॉ. अशोक जीवतोडे यांनी या निमित्ताने व्यक्त केले.
या उद्घाटन सोहळ्याकरीता नागपूर येथे चंद्रपूर,
यवतमाळ, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात शेकडो ओबीसी विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.
