विद्यार्थी व विद्यार्थिनी कडून फीसच्या नावाखाली हजारो रुपयाची लुबाडनुक
कुलगुरू कडे अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीची मागणी
नांदेड उपजिल्हा प्रतिनिधी
गंगाधर गच्चे
मो 9922865253
नांदेड :- हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयामध्ये प्राचार्यांची जागाही महिलेला राखीव असताना आदेशामध्ये खाडा खोड करून प्राचार्य पद मिळवून विद्यार्थी व विद्यार्थिनी फीस च्या नावावर दहा ते वीस हजार रुपये घेऊन लबाडणूक करणाऱ्या प्राचार्याला त्वरित निलंबित करा या मागणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे
सविस्तर वृत्त असे की हिंगोली शहरात आदर्श महाविद्यालय नावारूपास आहे या ठिकाणी अकरावी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत व पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात परंतु याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असलेले विलास आघाव यांनी विद्यापीठाच्या आदेशामध्ये महिलेला राखीव जागा असताना त्याच्या आदेशामध्ये खाडाखोड करून प्राचार्य पदावर नियुक्ती मिळवली व नियुक्ती मिळवल्याच्या नंतर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरीब शेतकरी मागासवर्गीय मुलावर फिश च्या नावावर मोठ्या प्रमाणात दहा ते वीस हजार रुपये वसूल करून लुबाडणूक केली आहे तसेच त्यांच्या विरोधामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी अवैच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केल्याची तक्रारही पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे त्याचप्रमाणे त्यांनी शेतकरी मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विनाकारण त्रास देऊन शिवीगाळ केली आहे तसे त्यांच्याकडून अवाच्या सव्वा फिस वसूल करून घेऊन स्वतःचीच खीसे भरले आहेत त्यामुळे या प्रकाराची त्वरित चौकशी करून प्राचार्य विलास आघाव यांना त्वरित निलंबित करा त्याचबरोबर वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयातही विद्यार्थ्यांचे अशाच प्रकारे फसवणूक करीत आहेत त्यांच्याकडूनही पाच ते दहा हजार रुपये फिस च्या स्वरूपामध्ये घेत आहेत तेव्हा त्या महाविद्यालयाची चौकशी करून भुशीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी अत्याचार विरोधी समितीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे या निवेदनावर मुकुंद करवंदे प्रभावतीताई खंदारे सखाराम काळे एडवोकेट शरद कांबळे सिद्धार्थ खंदारे नरेश कोकरे शेख अजनातभाई एडवोकेट दिलीप सुर्यतळ चांदू नादरे पाटील राहुल गायकवाड शिवलिंग कसबे आदी जणांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या देऊन मागणी केली आहे
प्राचार्यांना त्वरित निलंबित करावे अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयापुढे उपोषण करणार असा इशाराही त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे
