रायगड जिल्हा परिषद समिती आरक्षण जाहीर: मोठ्या पक्षांनी सुरू केली हालचाल
प्रतिनिधी: सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
रायगड | अखेर प्रतीक्षा संपली असून रायगड जिल्हा परिषदेच्या समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे अनेक मातब्बर राजकीय नेत्यांना संधी मिळणार असून काहींना मात्र राजकीय समीकरणांमुळे ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे. आरक्षण जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या असून इच्छुकांची धडपड वाढली आहे.
जिल्हा परिषद समिती सभापती पदासाठी घोषित करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:
म्हसळा – अनुसूचित जाती (महिला)
तळा – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
श्रीवर्धन – अनुसूचित जमाती (महिला)
माणगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
अलिबाग – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
कर्जत – नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
महाड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
पनवेल – सर्वसाधारण (महिला)
खालापूर – सर्वसाधारण
उरण – सर्वसाधारण
मुरुड – सर्वसाधारण
सुधागड – सर्वसाधारण (महिला)
पोलादपूर – सर्वसाधारण
पेण – सर्वसाधारण (महिला)
रोहा – सर्वसाधारण (महिला)
या आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काही ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्यामुळे महिला नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, काही ठिकाणी अस्वस्थता देखील आहे.
राजकीय पक्षांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली असून येत्या काही दिवसांत या ठिकाणी कोणते चेहरे पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.