नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध; फडणवीसांनी सादर केले पुरावे

56

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध; फडणवीसांनी सादर केले पुरावे

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध; फडणवीसांनी सादर केले पुरावे
नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध; फडणवीसांनी सादर केले पुरावे

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी

मोबा. नं :- 9768545422

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मलिकांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, हे पुराव्यानुसार सादर करत गोप्यस्फोट केला आहे.

‘११९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोटातील गुन्हेगार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांचे नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध आहेत. मलिक कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीनं त्या गुन्हेगारांकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात खरेदी केली,’ असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुंबईच्या कुर्ला भागात एलबीएस रोडवर गोवावाला कम्पाउंड नावाची जमीन आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या साॅलिडस कंपनीनं २००७ साली जमिनीचे पावर आॅफ अॅटर्नी असलेल्या शाह वली खान व सलीम पटेल यांच्याकडून ती जमीन खरेदी केली. अवघी ३ एकर जमीन ३० लाखांत खरेदी केली,’ असे फडणवीस यांनी सांगितलं.

‘स्वत: नवाब मलिक हे काही वर्षापूर्वीपर्यंत साॅलिडस कंपनीत संचालक होते. कालांतरानं त्यांनी राजीनामा दिला. मात्र आजही त्यांचे कुटुंबीय कंपनीत आहेत. मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्याची गरज का भासली ?, हे गुन्हेगार आहेत त्यांना माहित नव्हते का ?,’ असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.